April 23, 2026 9:19 pm

नगरसेविका प्रतिभाताई चोरघे लागल्या दुसऱ्या दिवशीच सकाळी सकाळी कामाला !

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

 

निवडून येताच कामाला सुरुवात; नगरसेविका प्रतिभाताई चोरघेंचा ‘ॲक्शन मोड

पुणे | 17 जानेवारी 2026

कालच पार पडलेल्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३८ मधून प्रतिभाताई रोहिदास बापू चोरघे या मोठ्या मताधिक्याने नगरसेविका म्हणून निवडून आल्या. मात्र निकालाचा जल्लोष न करता, निकालाच्या दुसऱ्याच दिवशी सकाळीच त्या थेट नागरिकांच्या प्रश्नांकडे लक्ष देत कामाला लागल्याने परिसरात सकारात्मक चर्चा सुरू आहे.

रिंगरोड प्रकल्पामुळे प्रभाग क्रमांक ३८ अंतर्गत येणाऱ्या निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, जांभुळवाडी व कोळेवाडी परिसरातील अनेक गरीब व सर्वसामान्य नागरिकांची घरे बाधित होण्याची शक्यता आहे. या गंभीर विषयावर कोणताही विलंब न करता, नगरसेविका प्रतिभाताई चोरघे यांनी सकाळीच नागरिकांशी संवाद साधत त्यांचे प्रश्न समजून घेतले.

यानंतर त्यांनी आमदार मा. विजय बाप्पुसाहेब शिवतरे यांना निवेदन देत,

“विकासाच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांचे संसार उद्ध्वस्त होता कामा नयेत. ज्या बाजूने नागरिकांची घरे व शेती बाधित होणार नाहीत, त्या पर्यायी मार्गाने रिंगरोड नेण्यात यावा,” अशी ठाम भूमिका मांडली.

नागरिकांनीही प्रतिभाताईंच्या या तत्परतेचे स्वागत करत,

“निवडून येताच कामाला लागणारी नगरसेविका मिळाली,” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

नुकताच जनतेचा कौल मिळाल्यानंतर कोणताही वेळ न घालवता थेट जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी मैदानात उतरलेली ही भूमिका, आगामी काळात प्रभाग ३८ साठी आशादायक ठरेल, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!