April 23, 2026 4:57 pm

कात्रज मध्ये श्रीमद् भागवत सप्ताहाचे आयोजन 

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

माय माऊली केअर सेंटर च्या वतीने विशेष आध्यात्मिक सोहळा

 

कात्रज पुणे

कात्रज येथील माय माऊली केअर सेंटर च्या माध्यमातून या अध्यात्मिक सोहळ्याचे आयोजन केले असून या भव्य दिव्य अशा श्रीमद् भागवत सप्ताह चे 14 जानेवारी मकर संक्रांतीच्या विशेष मुहूर्तावरती दुपारी तीन वाजता या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील महान दानशूर व्यक्तिमत्व कार्यक्रमाचे आधारस्तंभ श्री.शेठ नानजीभाई ठक्कर (ठाणावाला), आयोजक, भाविकभक्त आणि नागरिकांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी म्हणून कथा प्रवक्ते शास्त्रीजी जीदन्येश जयेशभाई जोषी यांच्या रसाळ वाणीतून या सुंदर अशा कथेचे निरुपण करण्यात येत आहे. याप्रसंगी परिसरातील मोठ्या संख्येने भाविकभक्त महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते, मंत्रमुग्ध होणारे अशा या शास्त्री यांच्या रसाळ वाणीतून अध्यात्माचा आणि प्रवचनाचा अनेक लोक लाभ घेत आहेत.

या कार्यक्रमाचे आयोजक माय माऊली सेंटरचे संस्थापक, अध्यक्ष विठ्ठलराव वरुडे पाटील यांनी केली आहे. याप्रसंगी त्यांनी परिसरातील नागरिकांना आव्हान केले की हा 14 जानेवारी ते 20 जानेवारी 2026 या कालावधीत दररोज दुपारी तीन ते सहा या दरम्यान होणार आहे, या दरम्यान प्रवचन महाआरती व महाप्रसादाचे वाटप होणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या सोहळ्यातील भक्तीरसाचा आस्वाद सहकुटुंब सहपरिवार सर्वांनी मिळून उपस्थित राहत आस्वाद घ्यायचा आहे. असे आवाहन करण्यात येत आहे.

या कार्यक्रमाचे आयोजनामध्ये श्री विकासजी मुंदडा, विशाल वरुडे पाटील, शांतीलालजी बाफना, हेमलता जैन यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे.

कथाकार शास्त्री यांनी आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून विविध अध्यात्मिक विषयावर सखोल मार्गदर्शन होणार असून. सुदामा चरित्र या कथेने कार्यक्रमाचे सांगता होणार आहे. सामाजिक अध्यात्मिक विचारांचा सुरेखाचा मेळ घालत वर्तमान काळात अशा प्रवचनांची गरज असल्याचे त्यांनी आवर्जून सर्वापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी सुनीलभाऊ रासने, डॉ. विश्वासराव आरोटे, ह भ प विष्णू महाराज केंद्रे,

मगरराजजी राठी, राजेश अग्रवाल, बाळासाहेब धोका, तानाजी लामखंडे, सहजान शेख,जयंत घोरपडे, कांतीराम बोऱ्हाडे, कृष्णाजी शेलार, शोभा सोलंकी यासह अनेक दिग्गज मान्यवर मंडळी या प्रवचन सेवेचा लाभ घेत आहेत.

या दरम्यान कार्यक्रमाचे संयोजन पद स्वीकारण्याची उत्तम सुवर्णसंधी लाभ मिळणार असून ज्या भावी भक्तांना याचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी 9222012707 या क्रमांकावर ती संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!