April 23, 2026 6:32 pm

उत्कृष्ट कामगिरीची पावती.. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत वांगणीला इलेक्ट्रिक कचरा संकलन गाडीचे वितरण..

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतिचा गौरव करण्यात येत असून 10 जानेवारी 2026रोजी तालुक्यातून निवडक ग्रामपंचायतींना इलेक्ट्रिक कचरा संकलन गाड्यांचे वितरण करण्यात आले. यामध्ये राजगड वेल्हे तालुक्यातील ग्रामपंचायत वांगणीने बाजी मारली असून श्री गजानन पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांच्या हस्ते सरपंच सौ. शीतल Dnyaneshwar चोरघे, उपसरपंच श्री रोहिदास चोरघे व ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती आरसुले तोशीबा यांच्याकडे गाडीची चावी सन्मानपूर्वक सुपूर्त करण्यात आली. वांगणी गावात पंचायत राज अभियान उत्कृष्ट काम करत सातत्य राखलेबाबत हा सन्मान करण्यात आला. मा

गजानन पाटील साहेब यांच्या प्रेरणेतून गावामध्ये मॉडेल स्कूल मंजूर झाले असून त्यासाठी गावातील शैक्षणिक क्षेत्रात होणाऱ्या बदलामुळे गावात नक्कीच विकास होईल यामुळे ग्रामपंचायत वांगणी व सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने पोलिस पाटील श्री. जितेंद्र मुजुमुले , माजी सरपंच श्री विजय चोरघे, श्री ज्ञानेश्वर चोरघे यांनी साहेबांचे मनःपूर्वक आभार मानले. व यापुढेही आमच्या गावात विविध उपक्रम राबवून गावाचा विकास आणि प्रगती नक्कीच होणार याची शाश्वती देण्यात येईल.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!