April 23, 2026 9:17 pm

केळवडे येथे सामुदायिक बायोगॅस प्रकल्पाचे भूमिपूजन

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

नसरापूरः केळवडे (ता. भोर) ग् ग्रामपंचायत व ग्गामस्थांच्या पुढाकाराने सामुदायिक बायोगॅस प्रकल्प साकारत आहे. ही बाब जिल्ह्यासाठी आदर्शवत आहे. यासाठी ग् ग्रामस्थांबरोबर सरपंच, सदस्य व ग्गामअधिकाऱ्यांनी घेतलेली मेहनत प्रशंसनीय आहे. या प्रकल्पामुळे केळवडे गाव विजेबाबत आत्मनिर्भर होणार असल्याचे आमदार शंकर मांडेकर यांनी प्रतिपादन केले.

केळवडे येथील बायोगॅस प्रकल्पाच्या भूमिपूजनप्रसंगी मांडेकर बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी चंद्रकांत विपट, पुणे जिल्हा जिल्हा बँकेचे तज्ज्ञ संचालक भालचंद्र जगताप, रणजित शिवतरे, चंद्रकांत बाठे, विक्रम खुटवड, गणेश बागल, नंदू कोडे, गणेश निगडे, विशाल कोंडे, संदीप कदम, माऊली पांगारे, सरपंच मनीषा भरत सोनवणे, उपसरपंच निर्मला सुनील कदम, ग् ग्रामपंचायत अधिकारी संभाजी जगताप, सदस्या सुरेखा धनाजी कोंडे, प्रमिला पांडुरंग कुंभार, सोनम बाळासोा गव्हाणे, मंजूश्री सुहास कोडे, पांडुरंग हनुमंत कोडे, आकाश मच्छिंद्र कोडे, विश्वास सुदाम मदने, विलास मरळ, भरत सोनवणे, धनाजी कोंडे उपस्थित होते.

फोरकॉस्ट अॅग गोटेक इनोव्हेशनचे आशिष भोसले यांनी प्रकल्पाची माहिती दिली. भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर यांच्या तंत्रज्ञानावर आधारित 1 टन प्रतिदिन क्षमतेचा बायोगॅस व 5 टन प्रतिदिन क्षमतेचा स्लरी खतनिर्मितीचा हा प्रकल्प आहे.त्यास 96 लाख रुपये खर्च येणार आहे. यासाठी गाव व परिसरातील सुमारे एक टन ओला कचरा दररोज लागणार आहे. दररोज साधारण 145 युनिट वीजनिर्मिती होईल. गावातील सार्वजनिक उपक्रमासाठी ती वापरली जाईल. यामधन दररोज 5 टन प्रॉम व बायोस्लरी या खतांची निर्मिती होणार आहे. त्याच्या वापराबाबत ग्रामपंचायत निर्णय घेईल.गावच्या हितासाठी जागा उपलब्ध करून देणारे बाळासाहेब चोरघे तसेच या प्रकल्पासाठी विशेष प्रयत्न करणारे तत्कालीन ग्ः ग्रामपंचायत अधिकारी अभय निकम यांचा यावेळी हस्ते सत्कार करण्यात आला.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!