April 23, 2026 4:47 pm

‘पॉवर कपल’! एकाच पालिकेत

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

राजकीय घराणेशाहीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे राज्यात अनोखी घटना घडली आहे. एकाच नगर पालिकेत एका दाम्पत्याच्या हाती सत्तेची सूत्रे आली आहेत. पत्नी नगराध्यक्ष असून तिच्या पाठोपाठ पतीदेखील उपनगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. राज्यात आता या ‘पॉवरफुल कपल’ची चर्चा सुरू झाली आहे.

 

परभणी जिल्ह्यातील मानवत नगरपालिकेने आज राज्याच्या राजकारणात एका ऐतिहासिक आणि अभूतपूर्व विक्रमाची नोंद केली आहे. नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी आधीच राणी लाड विराजमान असताना, आता त्यांचे पती डॉ. अंकुश लाड यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतिहासात पती आणि पत्नी एकाच वेळी शहराच्या प्रथम आणि द्वितीय नागरिक पदावर असण्याचे हे अत्यंत दुर्मिळ उदाहरण ठरले आहे.

मानवत नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे १६ सदस्यांसह निर्विवाद वर्चस्व आहे. यामुळे डॉ. अंकुश लाड यांची निवड निश्चित मानली जात होती. मात्र, राष्ट्रवादीच्या या भक्कम ताकदीसमोर विरोधकांनी सपशेल माघार घेतल्याने ही निवड बिनविरोध पार पडली.नगरपालिकेत सध्या शिंदे सेनेचे ४, उद्धव सेनेचा १ आणि भाजपचा १ सदस्य आहे, मात्र कुणीही उमेदवारी अर्ज न भरल्याने लाड यांचा मार्ग मोकळा झाला.

राजकारण पुरे, आता विकासावर लक्ष…

निवडीनंतर जल्लोषात सहभागी होताना लाड दाम्पत्याने शहराच्या विकासाचा निर्धार व्यक्त केला. “निवडणूक होईपर्यंत राजकारण होते, आता ते संपले आहे. आमचे संपूर्ण लक्ष आता मानवत शहराच्या प्रलंबित प्रश्नांवर आणि सर्वांगीण विकासावर असेल. सर्व सदस्यांना सोबत घेऊन आम्ही शहराचा कायापालट करू,” अशी ग्वाही नगराध्यक्षा राणी लाड आणि नवनियुक्त उपनगराध्यक्ष डॉ. अंकुश लाड यांनी दिली. या निवडीमुळे लाड समर्थकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण असून, संपूर्ण मानवत शहरात फटाक्यांच्या आतषबाजीत आणि गुलालाच्या उधळणीत जल्लोष साजरा करण्यात आला.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!