April 23, 2026 8:00 pm

डॉ. माधव गाडगीळ यांच्यासाठी १३ जानेवारीला श्रद्धांजली सभा

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्या पवित्र स्मृतींना उजाळा देण्यासाठी व त्यांच्या कार्यास अभिवादन करण्यासाठी पुण्यात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही श्रद्धांजली सभा मंगळवार, १३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० ते ७ या वेळेत आयोजित करण्यात आली आहे.

ही सभा पर्वती येथील मित्रमंडळ चौकाजवळ असलेल्या वनराई, आदित्य रेसिडेन्सी येथे होणार आहे. पर्यावरण संवर्धन, वनसंरक्षण आणि शाश्वत विकासाच्या क्षेत्रात डॉ. माधव गाडगीळ यांनी केलेल्या मोलाच्या कार्याची आठवण या वेळी उपस्थित मान्यवरांकडून करून दिली जाणार आहे.

या श्रद्धांजली सभेत पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ते, अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक सहभागी होऊन डॉ. गाडगीळ यांच्या आठवणींना उजाळा देणार आहेत. या कार्यक्रमात डॉ. गाडगीळ यांच्याविषयी कोणी दोन मिनिटे मनोगत व्यक्त करू इच्छित असल्यास, त्यांनी आपल्या नावासह श्री. अमित वाडेकर यांना ७८२०५६९३८८ या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. डॉ. गाडगीळ यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचावा, हा या सभेचा मुख्य उद्देश असल्याचेही आयोजकांनी सांगितले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!