April 23, 2026 9:17 pm

पिंपरी चिंचवड महापालिकेत मोठा राडा

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे:- पिंपरी चिंचवड महापालिकेत मोठा राडा सुरू आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली आहे. दादांच्या एका वक्तव्यानं उठलेलं वादळ काही शमलेलं नाही. आता स्थानिक भाजप नेत्यांनी दादांविरोधात शड्डू ठोकले आहेत. महेश लांडगेंचा रुद्रावतार पाहून जास्तच ताणल्या गेल्याचं समोर येत आहे.

 

माझ्यावर 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला. पण ज्यांनी माझ्यावर आरोप केले मी सत्तेत त्यांच्यासोबतच बसल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. भाजप आणि राष्ट्रवादीत मोठी ठिणगी पडली. या वादात भाजपचे सर्व नेते विरुद्ध अजितदादा असा सामना रंगला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादीविरुद्ध भाजप असा सामना होत आहे. महापालिकेतील वर्चस्व आणि सत्तेवरून सध्या भाजप आणि राष्ट्रवादीत चांगलीच जुंपल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यानंतर आता आमदार महेश लांडगे यांनी तर अजितदादांवर एकेरी भाषा वापरत निशाणा साधला आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी अजितदादांवर एकेरी भाषेत निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 70 हजार कोटींच्या घोटाळ्यात शिक्षा होणार असं म्हटलं अन संध्याकाळी हे भाजपमध्ये दाखल झाले.आता देवा भाऊंनी इशारा दिल्यावर आपले घोटाळे काढणारे सुद्धा जमा होणारेत, असा इशाराही लांडगे यांनी दिला. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने अजित पवारांनी महेश लांडगेंचा भ्रष्टाचाराचा आका असा उल्लेख केला होता. त्याला त्यांनी अशा शब्दात उत्तर दिले. त्यामुळे पिंपरी चिंचवड निवडणुकीचा आखाडा झाल्याचे म्हटले जात आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!