पिंपरी : सोशल मिडीयातील इंस्टाग्रामवर झालेल्या मैत्रीतून एका तरुणीचा विश्वास संपादन करून तिला मोबाईलमध्ये संशयास्पद लिंक डाऊनलोड करायला सांगत मित्राने बँक खात्यातून पैसे काढून घेतले. ही घटना १३ आणि १४ डिसेंबर २०२५ दरम्यान चऱ्होली बुद्रुक येथे घडली.
या प्रकरणात एका महिलेने दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तन्मय अमोल पांडे (१९, यवतमाळ, सध्या हिंजवडी) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तन्मय याने फिर्यादीच्या भाचीशी इंस्टाग्रामवर ओळख वाढवून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने तिला एक अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी लिंक पाठवली. फिर्यादीने ते अॅप डाऊनलोड करताच आरोपीने त्यांच्या मोबाईलचा ताबा मिळवला आणि खात्यातून ९२ हजार ७९४ रुपये काढून घेतले. दिघी पोलीस तपास करत आहेत.
Post Views: 8











