April 23, 2026 4:56 pm

कोरेगाव पार्कात फ्लॅटमध्ये शिरून चोरट्यांनी महिलेला लुटले

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे : कोरेगाव पार्कमधील एका सोसायटीतील तिसऱ्या मजल्यावरील घरात दोघा चोरट्यांनी एका महिलेला चाकूचा धाक दाखवून बांधून ठेवत घरातील ११ लाख ४० हजार रुपयांचे दागिने लुटून नेले.

 

याबाबत मंजु कैलास चौधरी (वय २९, रा. रजत रश्मी सोसायटी, लेन नं. ५, कोरेगाव पार्क) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी दोघा चोरट्यांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे सासू-सासरे राजस्थानला गेले होते. त्यांचे पती किराणा दुकानात गेले होते. त्या तिसऱ्या मजल्यावरील घरात एकट्याच असताना ४ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजता बेल वाजली म्हणून त्यांनी दार उघडले. तेव्हा मास्क व हँड ग्लोव्हज घातलेल्या दोघांनी घरात प्रवेश केला व दरवाजा आतून बंद केला.ओरडू नये म्हणून त्यांच्या तोंडावर हात ठेवला. हिंदीमध्ये “जो है निकाल” असे बोलून तोंडावरील हात काढला. तेव्हा त्यांनी “अँटी” अशी हाक मारली. त्यांच्यातील एकाने चाकू त्यांच्या गळ्याला लावून कपाटाची चावी कुठे आहे व कशामध्ये काय आहे, असे विचारले. त्यांनी चावी दाखविल्यावर कपाट उघडून कपाटातील सामान उचकटीत वस्तू शोधू लागले.त्या पुन्हा ओरडू लागल्यावर त्यांनी परत चाकू गळ्याला लावून मारण्याचा धाक दाखविला. साडीने हात पाठीमागे बांधले. एकाने त्यांना बेडरूममधून किचन रूमजवळ आणले. त्यावेळी दरवाजा डोक्याला लागून त्या खाली पडल्या.कपाटातील ८ तोळ्याचे २ गंठण, ५ तोळ्याचे दोन बाजूबंद, ४ तोळ्याचे रखडी असा एकूण १७ तोळ्यांचे ११ लाख ४० हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. काही वेळाने शेजारी राहणारे बाहेरून आल्यावर त्यांनी महिलेची सुटका केली. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करीत आहेत.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!