April 23, 2026 3:45 pm

देवमळा ग्रामपंचायतीसाठी प्रशासकाची नियुक्ती

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

जेजुरी:- पुरंदर तालुक्यातील जेजुरी ग्रामीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विस्तीर्ण परिसरासाठी नव्याने *देवमळा–स्टेशननगर ग्रामपंचायत* अस्तित्वात येत असून, या ग्रामपंचायतीसाठी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी *सागर दत्तात्रेय कांबळे* यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाकडून ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन प्रत्यक्ष निवडणूक होईपर्यंत प्रशासकीय कामकाज सुरळीत चालावे, यासाठी प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामविकास विभागाकडून अधिसूचना काढण्यात आली असून, *“देवमळा” या नावाने राजपत्र प्रसिद्ध* झाले आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेने प्रशासकीय कामकाज पाहण्यासाठी प्रशासक नियुक्त केला आहे. प्रशासकास महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता २०११ मधील तरतुदीनुसार *सरपंच पदाचे सर्व अधिकार व कर्तव्ये* प्राप्त असतील. ग्रामपंचायतीची निवडणूक झाल्यानंतर प्रशासक पद आपोआप संपुष्टात येईल, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहेत.

२००८ च्या प्राथमिक अधिसूचना व २००९ च्या अंतिम सूचनेनुसार करण्यात आलेली दुरुस्त विभागणी पुढीलप्रमाणे आहे :

देवमळा अंतर्गत –* १) दवणेमळा २) कुंभारकरवाडी ३) दोरगेवाडी ४) जगतापवस्ती ५) हनुमाननगर (पॉवर हाऊस) *स्टेशननगर अंतर्गत –* १) स्टेशन २) पवारवस्ती ३) माऊलीनगर ४) खोमणेमळा ५) कुतवळमळा ६) कोळेकरमळा ७) एम.आय.डी.सी.सह शिंदेवस्ती दरम्यान, या ऐतिहासिक निर्णयामागे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत बबन झगडे (अध्यक्ष, पंचायतराज व ग्रामविकास विभाग,भारतीय जनता पार्टी, पुरंदर तालुका पूर्व)* यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न, पाठपुरावा व जनतेसाठीची भूमिका निर्णायक ठरली असल्याचे बोलले जात आहे. जेजुरी नगरपालिका तसेच आजूबाजूच्या ग्रामपंचायतींमध्ये या परिसराचा समावेश नसल्याने नागरिकांना अनेक शासकीय सुविधा व योजनांचा लाभ मिळत नव्हता. ही बाब लक्षात घेऊन *चंद्रकांत झगडे यांनी प्रशासनाकडे दीर्घकाळ ग्रामपंचायतीची मागणी लावून धरली होती.* स्टेशननगर परिसरातून *शाम माने (सामाजिक कार्यकर्ते)* यांचेही सहकार्य महत्त्वाचे ठरले आहे.

यावेळी बोलताना चंद्रकांत झगडे म्हणाले,“ग्रामपंचायत अस्तित्वात नसल्यामुळे देवमळा व स्टेशननगर परिसरातील नागरिक अनेक शासकीय योजनांपासून वंचित होते. प्रशासकाची नियुक्ती झाल्याने आता शासनाच्या योजना प्रत्यक्षात नागरिकांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात होईल. लवकरच घरनिहाय नोंदणी,महसुली नोंदी,वॉर्ड रचना व इतर प्रशासकीय प्रक्रिया सुरू होतील.हा निर्णय म्हणजे परिसरातील नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीला मिळालेले ठोस यश आहे.”

या सर्व प्रक्रियेसाठी *देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री),जयकुमार गोरे (ग्रामविकास मंत्री),चंद्रशेखर बावनकुळे (महसूल मंत्री), रवींद्र चव्हाण (प्रदेश अध्यक्ष, भाजप)* यांचे सहकार्य लाभले. तसेच *विशेष सहकार्य* संजय जगताप (माजी आमदार),बाबाराजे जाधवराव (विधानसभा प्रमुख, पुरंदर – भाजप),गंगाराम जगदाळे (पुणे जिल्हा दक्षिण सरचिटणीस, भाजप), संजय काका निगडे (अध्यक्ष, भाजप पुरंदर पूर्व), *निलेश जगताप (माजी अध्यक्ष, भाजप)* तसेच *शेखर वढणे (पुणे जिल्हा दक्षिण पूर्व अध्यक्ष भाजपा)* यांचे सहकार्य लाभले आहे. देवमळा–स्टेशननगर ग्रामपंचायत स्थापन झाल्याने परिसराच्या *सर्वांगीण विकासाला गती मिळणार* असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!