September 4, 2026 9:27 am

नियमबाह्य चिकन विक्रीवर जालना महापालिकेचा दणका; ३ दुकाने सील, ३ दुकानांना दंड

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

मंठा नाका व खरपुडी रोड परिसरात महापालिकेची धडक कारवाई

जालना : शहरातील नियमबाह्य चिकन विक्रीला आळा घालण्यासाठी जालना महानगरपालिकेने धडक कारवाई केली. मंठा नाका रोड आणि खरपुडी रोड परिसरात करण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत नियमांचे उल्लंघन करणारी तीन चिकन विक्रीची दुकाने सील करण्यात आली, तर अन्य तीन दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

महापालिका आयुक्त अंजली शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. शहरातील चिकन-मटण विक्री केंद्रांनी महापालिकेने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे, परिसरात स्वच्छता राखावी तसेच आवश्यक परवानग्या व इतर नियमांची पूर्तता करावी, यासाठी महापालिकेकडून तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.

या मोहिमेअंतर्गत मंठा नाका रोड आणि खरपुडी रोड परिसरातील विविध चिकन विक्री केंद्रांची पाहणी करण्यात आली. पाहणीदरम्यान नियमबाह्य पद्धतीने व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आलेल्या तीन दुकानांवर सीलची कारवाई करण्यात आली. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अन्य तीन दुकानांवर दंड ठोठावण्यात आला.

चिकन-मटण विक्री व्यवसाय करताना महापालिकेच्या नियमांचे पालन करणे, स्वच्छता राखणे आणि आवश्यक परवानग्या घेणे गरजेचे आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या आस्थापनांमध्ये स्वच्छता व नियमांचे पालन होणे आवश्यक असल्याने महापालिकेने ही तपासणी मोहीम सुरू केली आहे.

महापालिकेच्या या कारवाईमुळे नियमांचे उल्लंघन करून व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे. यापुढेही शहरातील चिकन-मटण विक्री केंद्रांची तपासणी करण्यात येणार असून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.

उपायुक्त त्रिंबक कांबळे आणि सहाय्यक आयुक्त विजय फुलंब्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. चिकन-मटण विभागाचे प्रमुख मोहम्मद अमजद खान यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या पथकाने कारवाई केली.

महापालिकेच्या पथकात मुकेश गायकवाड, रामेश्वर जाधव, राहुल जाधव, राधेश्याम लोखंडे, राहुल लोखंडे, विक्रांत किर आणि सचिन ढवळे यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी सहभागी झाले होते.

महापालिकेच्या या कारवाईमुळे नियमबाह्य चिकन विक्रीला आळा बसण्यास मदत होणार असून, शहरातील चिकन-मटण विक्री केंद्रांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!