September 5, 2026 10:37 am

जी. एम. आय. कन्याशाळेत १०१ विद्यार्थिनींची मोफत रक्त तपासणी

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे, खडकी : विद्यार्थिनींच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने खडकी येथील जी. एम. आय. कन्याशाळेतील नववी आणि दहावीच्या विद्यार्थिनींसाठी नुकतेच मोफत रक्त तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. ट्री आय फाउंडेशनच्या ‘ध्रुव’ प्रकल्पांतर्गत आयोजित या शिबिराचा १०१ विद्यार्थिनींनी लाभ घेतला.

विद्यार्थिनींच्या आरोग्याची नियमित तपासणी व्हावी आणि विशेषतः हिमोग्लोबिनच्या कमतरतेचे वेळेत निदान व्हावे, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तपासणीदरम्यान हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आढळलेल्या विद्यार्थिनींसाठी ट्री आय फाउंडेशनतर्फे पुढील चार महिन्यांच्या कालावधीत विशेष पोषण आहार उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

हिमोग्लोबिन कमी असलेल्या विद्यार्थिनींना आठवड्यातून चार वेळा मोहाचे पौष्टिक लाडू देण्यात येणार आहेत. या उपक्रमानंतर सुमारे चार महिन्यांनी संबंधित विद्यार्थिनींची पुन्हा रक्त तपासणी करण्यात येणार असून, हिमोग्लोबिनच्या प्रमाणातील सुधारणा तपासली जाणार आहे.

ट्री आय फाउंडेशनतर्फे खडकी शिक्षण संस्थेच्या विविध शाखांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जातात. विद्यार्थिनींच्या आरोग्याचा विचार करून राबविण्यात येत असलेला हा उपक्रम त्याच सामाजिक बांधिलकीचा एक भाग आहे.

संस्थेतील पर्यवेक्षिका अनिता झांबरे यांच्या विशेष प्रयत्नातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराला खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, सचिव आनंद छाजेड, संचालक रमेश अवस्थे, संचालक ज्ञानेश्वर मुरकुटे तसेच संस्थेच्या विविध शाखांचे प्राचार्य आणि पर्यवेक्षक यांनी भेट देऊन उपक्रमाची माहिती घेतली.

यावेळी अंजुम इनामदार यांनी ट्री आय फाउंडेशनच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी फाउंडेशनच्या प्रिया जोशी आणि सोनाली पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

विद्यार्थिनींच्या आरोग्याची वेळोवेळी तपासणी, हिमोग्लोबिनच्या कमतरतेचे निदान आणि त्यानंतर आवश्यक पोषण आहार उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमामुळे विद्यार्थिनींच्या आरोग्याबाबत सकारात्मक परिणाम होण्यास मदत होणार आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!