पुणे, दि. २४ जुलै : पुणे जिल्ह्यातील जुन्या कात्रज बोगद्याजवळ घडलेल्या निर्घृण हत्येचा उलगडा करत पुणे ग्रामीण पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. तब्बल २३ वर्षांपूर्वी झालेल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हा कट रचल्याचा प्राथमिक तपासात उलगडा झाला आहे. या प्रकरणात आणखी एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. अटक केलेल्या आरोपींपैकी एकाकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये मंथन दिनेश वैद्य, सौरभ सागर परदेशी, मिजान गौसुद्दीन शेख आणि संदीप बाबूलाल कोरी यांचा समावेश आहे. तर, संजय बाबुराव कडू-देशमुख (वय ४०, रा. मुंढवा, मूळ रा. कुरण, ता. वेल्हे) असे मृताचे नाव आहे. संजय देशमुख हा सराईत गुन्हेगार म्हणून ओळखला जात होता.
रिक्षा अडवून धारदार शस्त्रांनी सपासप वार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जुलै रोजी सायंकाळी संजय देशमुख हे रिक्षाने पुणे–सातारा महामार्गावरून प्रवास करत होते. जुना कात्रज बोगदा पार केल्यानंतर दोन दुचाकींवरून आलेल्या आरोपींनी त्यांच्या रिक्षेला अडवले. त्यानंतर धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर सपासप वार करत अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सीसीटीव्ही, तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे उलगडा
घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि राजगड पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, तांत्रिक विश्लेषण आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान मंथन वैद्य आणि सौरभ परदेशी यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी मिजान शेख आणि संदीप कोरी यांच्या मदतीने हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर उर्वरित दोघांनाही अटक करण्यात आली.
दरम्यान, आरोपी संदीप कोरी याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून, या शस्त्रांचा इतर गुन्ह्यांमध्ये वापर झाला आहे का, याचाही तपास सुरू आहे.
२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा सूड
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, २००३ मध्ये विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंथन वैद्य यांचे वडील दिनेश वैद्य यांची हत्या झाली होती. त्या प्रकरणात संजय देशमुख याच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. त्यावेळी मंथन अवघा दीड वर्षांचा होता. संजय देशमुख याला या प्रकरणात अटक झाली होती. तो साडेतीन वर्षे कारागृहात राहिल्यानंतर जामिनावर बाहेर आला होता.
पोलिसांच्या तपासानुसार, वडिलांच्या हत्येतील आरोपीला योग्य शिक्षा झाली नाही, ही भावना मंथनच्या मनात कायम होती. याच रागातून त्याने साथीदारांच्या मदतीने संजय देशमुख यांचा खून करण्याचा कट रचल्याची कबुली दिली आहे.
तीन महिने हालचालींवर ठेवली पाळत
यावर्षी एप्रिल महिन्यात जामिनावर बाहेर आल्यानंतर मंथन वैद्य याने देशमुख यांच्यावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. गेल्या तीन महिन्यांपासून आरोपी त्यांच्या हालचालींची माहिती गोळा करत होते. न्यायालयात येणे-जाणे, प्रवासाचे मार्ग आणि दिनक्रम याचा अभ्यास करून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हा कट रचण्यात आल्याचे तपासातून समोर आले आहे.
पूर्वीही हल्ल्याचा प्रयत्न
तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात शिवाजीनगर न्यायालयाबाहेर संजय देशमुख यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र तो अयशस्वी ठरला. त्यानंतर आरोपींनी त्यांच्यावर अधिक बारकाईने पाळत ठेवली आणि ११ जुलै रोजी शिंदेवाडी परिसरातील जुन्या कात्रज बोगद्यालगत संधी साधून त्यांची हत्या केली.
फरार आरोपीचा शोध सुरू
राजगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी सांगितले की, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींना १४ जुलै रोजी अटक करण्यात आली. सुरुवातीला त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली होती. सध्या सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत असून, या गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
टोळी संघर्ष पुन्हा चर्चेत
या हत्येनंतर पुणे आणि परिसरातील गुन्हेगारी टोळ्यांच्या हालचाली पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. पोलिसांकडून या प्रकरणामागील संपूर्ण कट, इतर संशयितांचा सहभाग, वापरण्यात आलेली शस्त्रे आणि आर्थिक किंवा गुन्हेगारी संबंध यांचा सखोल तपास सुरू आहे. फरार आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
(टीप : वरील माहिती ही पोलिसांच्या प्राथमिक तपास आणि अधिकृत माहितीनुसार असून, न्यायालयीन प्रक्रियेनंतरच आरोपींचा दोष निश्चित होईल.)

Post Views: 11