May 29, 2026 3:20 am

आंबेगावात पेट्रोलचा कृत्रिम तुटवडा रोखा

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

आंबेगाव तालुक्यात पेट्रोलचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून नागरिकांची गैरसोय करू नका. शासनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आंबेगावचे प्रभारी तहसीलदार डॉ. सचिन वाघ यांनी शनिवारी (ता.२३) घोडेगाव येथे तहसीलदार कार्यालयात झालेल्या पेट्रोल पंप चालकांच्या आढावा बैठकित दिला.

यावेळी २८ पेट्रोल पंप चालक व तालुका पुरवठा अधिकारी माधुरी संतोषवार उपस्थित होत्या. बैठकीत इंधन वितरण, साठा व्यवस्थापन आणि नागरिकांना सुरळीत सेवा पुरविण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या.

यावेळी डॉ. वाघ यांनी पेट्रोल पंप चालकांना स्पष्ट निर्देश देताना कृत्रिम तुटवडा निर्माण करू नये, अतिरिक्त साठेबाजी टाळावी आणि शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार व नियमांनुसार इंधन विक्री करावी, असे सांगितले.

तसेच कोणत्याही प्रकारचा नियमभंग, साठेबाजी किंवा अनियमितता आढळल्यास तक्रारींची शहानिशा करून संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

नागरिकांनाही त्यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. तालुक्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा सुरळीत सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कुठेही नियमबाह्य प्रकार आढळल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा. असे डॉ. वाघ यांनी सांगितले. दरम्यान प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्यामुळे इंधन टंचाईला व साटेबाजेला आळा बसणारा आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!