June 5, 2026 6:49 am

बेजबाबदार उत्तर देणाऱ्या पोलीस निरीक्षकाला दणका

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

कर्तव्यात निष्काळजीपणा दाखवणे आणि बेपत्ता मुलीच्या पालकांना “वाहनात डिझेल नाही” असे अत्यंत बेजबाबदार उत्तर देणे पाचपावली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांना चांगलेच अंगलट आले आहे.

या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आणि सर्वत्र तीव्र संताप व्यक्त झाल्यानंतर, नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी राऊत यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात (कंट्रोल रूम) बदली केली आहे.

पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका कुटुंबातील 21 वर्षांची मुलगी बेपत्ता झाली होती. तिची तक्रार नोंदवण्यासाठी आणि तिला शोधण्याची विनंती करण्यासाठी हताश झालेले कुटुंब पोलीस ठाण्यात गेले होते. अशा संवेदनशील प्रकरणात पोलिसांनी तातडीने पावले उचलणे आवश्यक असताना, पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत आणि तेथील कर्मचाऱ्यांनी कमालीची उदासीनता दाखवली.

बेपत्ता मुलीचा शोध घेण्याऐवजी पोलिसांनी पालकांना सांगितले, “मुलगी 21 वर्षांची असल्याने ती स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते. तिला जिथे जायचे असेल तिथे जाऊ शकते.” एवढेच नव्हे तर, जेव्हा कुटुंबाने शोध घेण्याचा आग्रह धरला, तेव्हा राऊत यांनी “आमच्या वाहनात डिझेलच नाही; तुमची मुलगी कशी शोधू?” असे उत्तर दिले.

जेव्हा तक्रारदाराने विचारले, ‘सरकारकडून तुम्हाला डिझेल मिळते ना?’, त्यावर ‘अरे, खरोखरच डिझेल नाही,’ असे उत्तर पोलीस अधिकाऱ्याने दिले. या संपूर्ण संभाषणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरिकांमधून पोलिसांच्या या भूमिकेवर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

पोलिसांनी इंधन नसल्याचे किरकोळ कारण देऊन तपास टाळल्याची ही धक्कादायक घटना समोर येताच राजकीय वर्तुळात आणि प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली. राज्याच्या गृहमंत्रालयाने या प्रकरणाची तातडीने आणि अत्यंत गंभीर दखल घेतली. गृहमंत्रालयाकडून थेट नागपूर पोलीस आयुक्तांकडे या निष्काळजीपणाबाबत जाब विचारण्यात आला.

गृहमंत्रालयाचा कडक संदेश मिळताच पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी 24 तासांच्या आत तडकाफडकी पावले उचलली आणि बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांना पाचपावली पोलीस ठाण्यातून हटवून थेट नियंत्रण कक्षाचा रस्ता दाखवला आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!