June 5, 2026 6:49 am

पुणे मेट्रो विस्ताराला गती

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

वनाज ते चांदणी चौक या विस्तारित मेट्रोमार्गाच्या कामाला आता खऱ्या अर्थाने वेग आला असून, या मार्गावर सध्या मातीपरीक्षणाचे काम सुरू आहे. हा संपूर्ण प्रकल्प डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट महामेट्रोने ठेवले आहे.

वनाज ते चांदणी चौक हा मार्ग पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. चांदणी चौक परिसरात होणारी वाहतूक कोंडी आणि कोथरूड भागातील वाढती लोकसंख्या पाहता, हा मेट्रोविस्तार येथील नागरिकांना मोठा दिलासा देणारा ठरेल. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पिलर (खांब) उभारणीसाठी आवश्यक असणारी जमिनीची क्षमता तपासण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी मातीचे नमुने घेतले जात आहेत. हे काम पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष खांब उभारणीच्या कामाला सुरुवात होणार आहे.

चंद्रशेखर तांबवेकर, अतिरिक्त महाव्यवस्थापक, महामेट्रोवनाज ते चांदणी चौक हा विस्तारित मार्ग पुणेकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्या या मार्गावरील भौगोलिक आणि तांत्रिक सर्वेक्षणासह मातीपरीक्षणाचे काम वेगाने सुरू आहे. प्रत्यक्ष बांधकामाला लवकरच सुरुवात होईल. वाहतुकीला कमीत कमी अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने कामाचे नियोजन करण्यात आले आहे. डिसेंबर 2027 च्या ठरलेल्या मुदतीत हा प्रकल्प पूर्ण करून प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यासाठी महामेट्रो कटिबद्ध आहे.

स्वारगेट ते कात्रज यादरम्यानच्या भूमिगत मेट्रोचे काम अत्यंत वेगाने सुरू आहे. या कामाचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून मार्केट यार्ड आणि बिबवेवाडी येथील प्रस्तावित मेट्रो स्टेशन परिसरातील वाहतूक नवीन मार्गावर वळविण्यात आली आहे. पुणे मेट्रो आणि पीएमपीएमएल यांनी संयुक्त समन्वय साधून प्रवाशांच्या सुविधेसाठी आणि सुरक्षिततेसाठी तसेच मेट्रोच्या कामाला गती देण्यासाठी वाहतुकीचे हे नवे नियोजन केले आहे. या अंतर्गत पीएमपी बससेवेचे मार्ग देखील बदलले आहेत, अशी माहिती मेट्रो प्रशासनाने दिली.

मोरेबाग ते भापकर पेट्रोल पंपदरम्यान पीएमपी बस आता रस्त्याच्या मध्यभागातील बीआरटी लेनऐवजी फुटपाथच्या बाजूला तयार करण्यात आलेल्या विशेष लेनचा वापर करतील. मेट्रो स्टेशनच्या बांधकाम क्षेत्रात बीआरटी लेन तात्पुरती बंद केली आहे. त्याऐवजी बीआरटी बस आणि इतर वाहनांसाठी एक एकत्रित आणि प्रशस्त ‌’डायव्हर्शन लेन‌’ प्रस्तावित करण्यात आली आहे. या भागातील बीआरटी बसथांबे तात्पुरते बंद केले असून, प्रवाशांच्या सुविधेसाठी फुटपाथच्या बाजूला तात्पुरते नवीन बसथांबे बांधून, ते सुरू करण्यात आले आहेत.

भापकर पेट्रोल पंप ते मोरेबागदरम्यान पीएमपी बस फुटपाथच्या बाजूने धावतील. नातूबाग बसथांब्यापर्यंत पुढे गेल्यानंतर या बस पुन्हा आपल्या मूळ बीआरटी लेनमध्ये मार्गस्थ होतील. डाऊन लाइनप्रमाणेच येथील स्टेशनच्या बांधकाम पट्‌‍ट्यात बीआरटी लेन बदलून, तिथे सर्व वाहनांसाठी व बससाठी एक सुरक्षित वाहतूक लेन उपलब्ध करून दिली आहे. येथील बीआरटी थांबे तात्पुरते स्थलांतरित करून फुटपाथच्या बाजूला नवीन थांब्यांची सोय करण्यात आली आहे.

पुणे मेट्रोमार्फत कात्रज पोलिस चौकीसमोरील पीएमपीच्या मुख्य बसस्थानकावर बुधवारपासून (दि. 20) मेट्रो स्टेशनच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. या मोठ्या विकासकामामुळे कात्रज पोलिस चौकीसमोरील बसस्थानक तात्पुरत्या स्वरूपात बंद केले असून, येथून सुटणाऱ्या सर्व बसेससाठी पीएमपी प्रशासनाने पर्यायी बसस्थानके आणि मार्ग निश्चित केले आहेत. बुधवारपासून हा बदल लागू केला आहे. ऐन गर्दीच्या काळात प्रवाशांची धावपळ होऊ नये, यासाठी प्रशासनाने वेगवेगळ्या मार्गांच्या बससाठी तीन प्रमुख पर्यायी ठिकाणे जाहीर केली आहेत.

असे असतील पर्यायी थांबे आणि मार्ग

कात्रज बायपास रोडवरील पुलाखालील मोकळी जागा

पुढील मार्गांवरील बस आता कात्रज बायपास रोडवरील पुलाखालून सोडल्या जातील. तसेच रातराणी बसेसही याच ठिकाणाहून धावतील.

बस मार्ग क्रमांक : 2, 2अ, 11क, 24, 24अ, 90, 103, 235, 236, 301, 301अ

‌’के‌’ सीरिज मार्ग : के 11, के12, के13, के14, के18

रातराणी सेवा : रातराणी 1 व रातराणी

गुजरवाडी बसस्थानक व पुलाखालील थांबा

गुजरवाडीहून सुटणाऱ्या बस कात्रज चौकातून डावीकडे वळण घेतील आणि पुलाखालील थांब्यावरून प्रवाशांना घेऊन पुढे मार्गस्थ होतील.

बस मार्ग क्रमांक : 42, 298, 299 आणि 339

कात्रज बायपास सर्व्हिस रोड

महामार्गाच्या दिशेने आणि इतर उपनगरांना जोडणाऱ्या या बस आता मुख्य चौकात न येता थेट सर्व्हिस रोडवरून धावतील.

बस मार्ग क्रमांक : 43, 43अ, 44, 45, 214 आणि 228

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!