June 5, 2026 6:55 am

बंडू आंदेकरने जेलच्या भिंतीआडून रचला रक्तरंजित कट?

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुण्यात पुन्हा एकदा टोळीवार संघर्ष तीव्र झाला आहे. बालाजीनगर परिसरात अक्षय म्हस्के यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या हल्ल्यामागे दोन वर्षांपूर्वी झालेल्या माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्याचा उद्देश असल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

सहकारनगर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्यावरून बंडू आंदेकर आणि त्याच्या टोळीने हा हल्ला आखल्याचे स्पष्ट झाले आहे. वनराज आंदेकर यांची भरचौकात निर्घृण हत्या झाल्यानंतर आंदेकर टोळीने बदल्याची भावना बाळगली होती. त्याच भावनेतून अक्षय म्हस्के यांना लक्ष्य करण्यात आले. अक्षय म्हस्के हे वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी आकाश म्हस्के यांचे भाऊ आहेत. या हल्ल्यामुळे पुणे पोलिसांच्या गँगवॉरविरोधी मोहिमेला नवे वळण मिळाले आहे.

सध्या कारागृहात असलेल्या आंदेकर टोळीप्रमुख बंडू आंदेकर याने जेलमधूनच हा कट रचल्याची शक्यता पोलिस तपासातून वर्तवली जात आहे. त्याच्यासह त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर, रामजी आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर यांच्यासह एकूण आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेलमध्ये राहून बंडूने हल्ल्याचे नियोजन केले की नाही, यासाठी त्याला भेटायला कोण आले होते याचा सखोल तपास पोलिस करत आहेत.

घटनेच्या अवघ्या काही तासात पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीच्या सहा सदस्यांना ताब्यात घेतले आहे. यात एक अल्पवयीन मुलगाही समाविष्ट आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये आफ्ताफ शरीफ सय्यद (राहणार भाग्यदेव नगर, कोंडवा खुर्द), ऋषी प्रसाद मोहन आंबट (वय २१, नाना पेठ), आवेज अशपाक शेख (वय २६, गणेश पेठ), वेदांत श्रीनिवास टेमगिरे (वय १९, भवानी पेठ) आणि अमन फारूक बागवाले (वय २१, भवानी पेठ) यांचा समावेश आहे. हे सर्व आरोपी आंदेकर टोळीचे सक्रिय सदस्य असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आंदेकर टोळीने वनराज आंदेकरांच्या हत्येचा वचपा काढण्यासाठी अक्षय म्हस्के यांच्या हत्येचा प्लॅन आखला होता. यापूर्वी वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर यांचा मुलगा आयुष कोमकर आणि समीर काळे यांचा भाऊ गणेश काळे यांचीही अशाच पद्धतीने हत्या करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर हा नवीन हल्ला टोळी युद्ध अधिकाधिक खोल जात असल्याचे दर्शवतो.

गोळीबारात जखमी झालेल्या अक्षय म्हस्के यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ला अत्यंत नियोजित पद्धतीने झाल्याने पोलिस या प्रकरणाला गांभीर्याने घेत आहेत. आंदेकर टोळीच्या इतर सदस्यांवरही नजर ठेवण्यात आली आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!