June 5, 2026 8:02 am

ठाण्यातील सर्वाधिक गर्दीच्या बाजारपेठेत अग्नितांडव

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

ठाणे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या गावदेवी भाजी मार्केटला रात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत.

ठाणे अग्निशामनदलाला रात्री या आगीसंदर्भात माहिती मिळाल्यानंतर अग्निशामन दलाच्या गाड्या तातडीने घटास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्यास सुरुवात करण्यात आली. काही तासांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामनदलाला यश आलं. मात्र या प्रयत्नात अग्निशामनदलातील दोन जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

रात्री साडेतीन वाजता आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान पाच फायर वाहनासहीत दाखल झाले. याचबरोबर तीन जम्बो वॉटर टँकर, 2 वॉटर टँकरसह, 4 रेस्क्यू वाहनासह व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. या ताफ्यामध्ये एका पिकअप वाहनासह, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, ठाणे महानगरपालिकेच्या तीन रुग्णवाहिका, 108 रुग्णवाहिका, खाजगी वॉटर टँकरही पोहोचले.

सदर घटनेत दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. दोन्ही जखमी व्यक्ती या अग्निशमन दलातील आहेत. 45 वर्षीय स्टेशन ऑफिसर सुजित पष्टे आणि 40 वर्षीय जवान समीर जाधव अशी जखमी झालेल्यांची नावं असून त्यांना उपाचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे या दोघांना दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

या आगीमध्ये दोन व्यक्ती मरण पावल्या आहेत. मृतांची ओळख पटली आहे. ठाणे महानगरपालिकेमधील आरक्षक काळू गाडेकरांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला असून ते 53 वर्षांचे होते. तसेच आग विझवताना अग्निशमन केंद्रातील स्टेशन ऑफिसर सागर शिंदेंचाही मृत्यू झाला असून ते 43 वर्षांचे होते.

गावदेवी परिसर हा ठाणे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असून या परिसरात कायम गर्दी असते. या ठिकाणी दाटीवाटीने मोठ्या प्रमाणात छोटी-मोठी दुकानं असून काही वर्षांपूर्वीच उभारण्यात आलेल्या गावदेवी भाजी मार्केटच्या इमारतीमध्येही भाजीपाल्याच्या दुकानांसोबतच कपड्यांची दुकानंही आहेत. याच इमारतीच्या खालील बाजूस वाहनतळही आहे. सुदैवाने ही आग वाहनतळापर्यंत पोहचली नाही आणि मोठा अनर्थ टळला. याच इमारतीमध्ये वरच्या बाजूला प्रबंधक नोंदणी कार्यालय असून त्याचं काही नुकसान झालं आहे का याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!