June 5, 2026 12:52 pm

पत्र्याच्या खोलीतून RCC क्लासला सुरूवात, वार्षिक टर्नओव्हर वाचून बसेल धक्का

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

देशभरात ‘नीट’ पेपरफुटीमुळे एकच खळबळ उडाली असून त्याचे धागेदोरे पुणे-नांदेड-लातूर येथेपर्यंत पोहोचले आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने ( सीबीआय ) सोमवारी लातूरमधील प्रसिद्ध आरसीसी कोचिंग क्लासेसचे सर्वेसर्वा, प्राध्यापक शिवराज मोटेगावर यांना अटक केली आहे.

नीट पेपरफुटीचे प्रकरण समोर आल्यानंतर ‘सीबीआय’नं शुक्रवारपासून मोटेगावकरांच्या क्लास आणि घराची झाडाझडती घेतली होती.

रविवारी ( १७ मे ) मोटेगावरकरांना पुण्यातील सीबीआय कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. सोमवारी ‘सीबीआय’ने ( १८ मे ) मोटेगावरकरांना अटक केली आहे. यानंतर शिवराज मोटेगावरकर कोण आहेत? अशी चर्चा सुरू झाली आहे.

‘जेईई’ आणि ‘नीट’ परीक्षेत पैकीच्या पैकी गुण रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस अर्थात आरसीसी ( RCC Class ) ही राज्यात फेमस आहे. ‘आरसीसी’च्या लातूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर, अकोल्यासह अनेक शहरांत शाखा विस्तारल्या आहेत. एकूणच डॉक्टर आणि इंजिनिअर घडवणारी फॅक्टरी म्हणून मोटेगावकरांच्या ‘आरसीसी’ क्लासकडे पाहिले जाते. याच ‘आरसीसी’ क्लासची वार्षिक उलाढाल १०० कोटींच्या घरात असल्याचं समोर येत आहे.

शिवराज मोटेगावकर हे महाराष्ट्राच्या कोचिंग क्षेत्रात ‘एम सर’ म्हणून प्रसिद्ध आहेत. लातूरचे रहिवासी असलेले मोटेगावकर रसायनशास्त्राचे अनुभवी शिक्षक आहेत. रेणापूर तालुक्यातील एका शेतकरी कुटुंबात मोटेगावकरांचा जन्म झाला असून, त्यांनी आपल्या मेहनतीने लातूरमधील रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस (आरसीसी) यांना महाराष्ट्रातील आघाडीच्या कोचिंग संस्थांपैकी एक बनवले आहे.

महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना मोटेगावकरांनी क्लासेस घेण्यास सुरूवात केली. त्यातून मिळणाऱ्या पैशांतून स्वत:चे शिक्षण पूर्ण केले. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तसेच लातूरमधील महाविद्यालयात तासिका तत्त्वावर रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले.

१९९९ मध्ये भाड्याच्या एका छोट्या खोलीत केवळ १० विद्यार्थ्यांसोबत त्यांनी कोचिंग क्लास सुरू केले. सुरुवातीच्या काळात ते सायकलवरून प्रवास करत असत आणि विद्यार्थ्यांसाठी स्वतः हाताने नोट्स तयार करत.

आज रेणुकाई करिअर सेंटर आणि ‘लातूर पॅटर्न’ हे महाराष्ट्रातील नीट, जेईई आणि सीईटी प्रवेश परीक्षांच्या तयारीशी जोडले गेले आहेत. ‘आरसीसी’ची रसायनशास्त्राची नोट्स, टेस्ट सिरीज आणि शिकवण्याची पद्धत संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत लोकप्रिय आहे. लातूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर, अकोल्यासह अन्य शहरांतील शाखांमध्ये ४०,००० हून अधिक विद्यार्थी शिकत असल्याचं बोललं जात आहे. आक्रमक जाहिरातबाजी आणि ऑनलाईन शिक्षण मॉडेलमुळे ‘आरसीसी’ क्लासला राज्यात एक ओळख मिळाली.

देशभरात ३ मे रोजी नीटची परीक्षा होती. परीक्षेच्या १० दिवस आधीच म्हणजेच २३ एप्रिलला शिवराज मोटेगावकर यांनी नीटची प्रश्नपत्रिका मिळवली होती. ‘सीबीआय’ चौकशीत मोटेगावकरांच्या मोबाईलमध्येच नीटची प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका मिळाल्याचं कळतंय. विवेक पाटील नावाच्या एक व्यक्तीला तसेच विद्यार्थ्यांना मोटेगावकरांनी नीटची प्रश्नपत्रिका पाठवली होती. मात्र, मोटेगावकर तपास यंत्रणेसमोर लाभार्थी विद्यार्थ्यांची नावे सांगण्यास टाळाटाळ करत आहे. त्यासह परीक्षा संपल्यानंतर प्रश्नपत्रिकेचे सर्व तांत्रिक पुरावे मोटेगावकरांनी नष्ट केल्याचं समोर येत आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!