June 5, 2026 3:12 pm

पत्नीचा गळा दाबून खून; पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने गोठ्यातील पाईपला लटकवले

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

जुन्नर तालुक्यातील निमगाव तर्फे म्हाळुंगे येथे एका विवाहित महिलेचा गळा दाबून खून करून तो आत्महत्येच्या बनावाचे स्वरूप दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून, जुन्नर पोलिसांनी पतीविरुद्ध खुनाचा गंभीर गुन्हा दाखल केला आहे.आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.

जुन्नर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, रूपाली नवनाथ पारखे (वय ३५, रा. निमगाव तर्फे म्हाळुंगे, ता. जुन्नर, जि. पुणे) यांचा संशयास्पद मृत्यू शुक्रवारी (दि. १६) दुपारी सुमारे १:३० वाजण्याच्या सुमारास घडला. या घटनेप्रकरणी मयत महिलेचे भाऊ विकास वसंत पवार (रा. बल्लाळवाडी) यांनी जुन्नर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, रूपाली पारखे यांचे पती नवनाथ बाजीराव पारखे (वय ४३, रा. निमगाव तर्फे म्हाळुंगे) यांनी पत्नीला शेतातील गोठ्यात नेले. त्यानंतर तिचा दोन्ही हातांनी गळा दाबून खून केला. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने तिच्या गळ्याला दोरी बांधून गोठ्यातील लोखंडी पाईपला लटकविले आणि तिने गळफास लावून आत्महत्या केल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या घटनेची माहिती समोर आल्यानंतर निमगावात एकच खळबळ उडाली. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच जुन्नर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

याप्रकरणी जुन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत झालेल्या वादातून ही घटना घडली असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. फिर्याद नोंदविण्याची प्रक्रिया सहायक पोलिस निरीक्षक मोरे यांनी पूर्ण केली असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गटकूळ करीत आहेत.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!