June 5, 2026 1:57 pm

ओव्हरटेकिंगच्या नादात ताबा सुटला

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

नगर-कल्याण महामार्गावर गुंजाळवाडी येथे रविवारी सायंकाळी झालेल्या भीषण एसटी बस अपघातात नवा खुलासा झाला आहे. पाऊस सुरू असतानाही इतर वाहनांना ओव्हरटेक करण्याच्या नादात आणि चालकाच्या बेदरकारपणामुळेच हा अपघात घडल्याचे निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणी आळेफाटा पोलिसांनी मयत बस चालक मोहम्मद सलीम मोहम्मद इसुफ याच्याविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.

अहिल्यानगरहून भिवंडीकडे निघालेली एसटी बस (एम एच १४ बीटी ४०२३) गुंजाळवाडी गावच्या हद्दीत आली असता हा अपघात घडला होता. या अपघातात चालक मोहम्मद सलीम (वय ४०, रा. अमरावती) आणि प्रशांत साईनाथ होनशेटे (वय २७, रा. नांदेड) या दोघांचा मृत्यू झाला आहे.

अपघातातील जखमी प्रवासी नितीन सिद्धार्थ काळे (वय ३७, रा. बदलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, परिसरात झिमझिम पाऊस पडत असतानाही बस चालक गाडी भरधाव वेगात चालवून इतर वाहनांना ओव्हरटेक करत होता. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि अंदाजे ३० प्रवाशांनी भरलेली बस थेट रस्त्याशेजारील खड्ड्यात पलटी झाली. फिर्यादीवरून पोलिसांनी मृत चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि मोटरवाहन कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे.

अपघातातील जखमींवर आळेफाटा येथील माऊली, कोकणे, शिवम आणि युनिक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर डुंबरे पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!