June 5, 2026 4:00 pm

पूजेला आले होते तरुण-तरुणी, भोंदूच्या मनात आलं पाप, विरोध करताच दोघांना संपवलं

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील कासारे गावात एका भोंदूबाबाने दोन निष्पाप तरुण-तरुणीचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नोकरीत स्थिरता आणि कौटुंबिक सुखासाठी पूजा करायला गेलेल्या जयश्री काकुस्ते आणि अक्षय सोनवणे या दोघांची भोंदूबाबा योगेश खैरनार याने हत्या केल्याची कबुली दिली आहे.

कासारे गावातील रहिवासी असलेले जयश्री रजनीकांत काकुस्ते आणि अक्षय गंगाधर सोनवणे हे दोघे ‘शनी अमावस्ये’ला भोंदू योगेश खैरनारकडे पूजेसाठी गेले होते. पूजा आटोपल्यानंतर भोंदू योगेश हा जयश्रीला दुचाकीवरून घरी सोडण्यासाठी निघाला. मात्र, रस्त्यातच त्याने तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. जयश्रीने या गोष्टीला तीव्र विरोध केला. यामुळे संतप्त झालेल्या भोंदूने ओढणीने तिचा गळा आवळून तिचा खून केला. हा खून नसून अपघात वाटावा यासाठी त्याने तिची दुचाकी तिच्या अंगावर टाकून दिली.

दुसरीकडे, अक्षय सोनवणे हा योगेशची वाट पाहत थांबला होता. योगेश परत आल्यावर अक्षयने त्याला उशीर का झाला, याबाबत विचारणा केली. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. रागाच्या भरात भोंदू योगेशने लोखंडी वस्तूने अक्षयच्या डोक्यात वार करून त्यालाही जागीच संपवलं. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने अक्षयचा मृतदेह डोंगरावर नेऊन पुरला. या संपूर्ण थरारनाट्याची कबुली स्वतः आरोपीनं पोलिसांना दिली आहे.

या दुहेरी हत्याकांडात पोलिसांनी आता मोठी कारवाई केली आहे. खून प्रकरणात भोंदू योगेशने दोषसिद्धीचे कारण सांगून कथित पूजा केली होती. त्यामुळे या गुन्ह्यात आरोपी योगेशविरुद्ध आता जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार वाढीव कलमे लावण्यात आली आहेत. यामुळे भोंदूच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

भोंदू योगेशला रविवारी दुपारी कडक पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी योगेशला आता २३ मे रोजी पुन्हा न्यायालयात उभे केले जाणार आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!