May 14, 2026 5:46 pm

छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेत छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे : आंबेगाव खुर्द येथील छत्रपती संभाजी महाराज पतसंस्था मध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेच्या कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात शाखेचे सल्लागार चंद्रकांत गुरव आणि रामचंद्र निकम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवर आणि नागरिकांनीही पुष्पांजली वाहून धर्मवीर संभाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि राष्ट्रनिष्ठेला अभिवादन केले.

या प्रसंगी सल्लागार चंद्रकांत गुरव, रामचंद्र निकम, ज्येष्ठ नागरिक सतीश मंगरुळे, विलास भोसले, तसेच पतसंस्थेचे ग्राहक शुभंकर निकम, श्रीकला थोरात, गौरी थोपटे उपस्थित होते. याशिवाय पतसंस्थेचे कर्मचारी सौ. गौरी शिंगटे, राकेश भोसले, मंगेश भंडलकर आदींनीही कार्यक्रमात सहभाग घेतला.

कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याचा आणि बलिदानाचा गौरव करत त्यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प व्यक्त केला. संपूर्ण वातावरण देशभक्ती आणि शिवप्रेमाच्या घोषणांनी भारावून गेले होते.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!