May 14, 2026 4:28 pm

पुणे-हडपसर बॉम्बसदृश प्रकरण : संशयित आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

शहरातील हडपसर परिसरात बुधवारी सायंकाळी एका खासगी रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच बॉम्बशोधक व नाशक पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतलेली.

प्राथमिक तपासणीदरम्यान संबंधित वस्तूमध्ये जिलेटिनच्या कांड्या असल्याचे उघड झाले. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी त्या कांड्या सुरक्षित ठिकाणी हलवून निकामी केल्या. यामुळे संभाव्य धोका टळला.

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी महत्त्वाची कारवाई करत संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे, आरोपी हा आरोग्य विभागाशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे प्रकरण अधिक संवेदनशील बनले असून तपास यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.

या प्रकरणाचा तपास सध्या स्थानिक पोलिसांसह एटीएसकडून संयुक्तरीत्या केला जात आहे. आरोपीने जिलेटिनच्या कांड्या कुठून आणि कशा मिळवल्या, याचा शोध घेतला जात आहे. या घटनेमागील नेमका उद्देश काय होता, याबाबतही चौकशी सुरू आहे.

टनेनंतर रुग्णालय परिसरात काही काळ भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणत नागरिकांना सुरक्षिततेबाबत आश्वस्त केले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!