May 14, 2026 12:18 am

पुरंदर किल्ल्यावर उद्या शिवपुत्र शंभू जन्मोत्सव धर्मवीर संभाजीमहाराज जयंतीनिमित्त उपक्रम

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

जेजुरी प्रतिनिधी : निलेश भुजबळ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवानिमित्त पुरंदर प्रतिष्ठान व संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, पंचायत समिती पुरंदर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १३ व १४ मे रोजी ऐतिहासिक किल्ले पुरंदर येथे भव्य शिवपुत्र शंभू जन्मोत्सव सोहळा आयोजित केला आहे. सोहळ्यास शिवशंभू भक्तांना उपस्थित राहण्याचे आवाहन पुरंदर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पाटणे यांनी केले आहे..

दोन दिवसीय सोहळ्याची सुरुवात बुधवारी (दि. १३) सायंकाळी ६ वाजता श्रीक्षेत्र नारायणपूर येथील प. पू. पोपट महाराज टेंबे स्वामी यांच्या हस्ते संभाजी महाराज मूर्ती पूजन व ज्योत प्रज्वलनाने होणार आहे. किल्ले पुरंदर येथे कार्यक्रमास प्रारंभ होईल. सायंकाळी ७ वाजता पुरंदर गडावर शंभुराजे महानाट्य तसेच ज्योती घेऊन येणाऱ्या मंडळांचे स्वागत करण्यात येणार आहे. रात्री महाप्रसादाचे आयोजन केले आहे.

गुरुवारी (दि. १४) सकाळी ७ वाजता पुरंदरेश्वर, केदारेश्वर, शिवरायांच्या मूर्तीचा अभिषेक होणार आहे. सकाळी ८ वाजता छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज जन्मोत्सव पाळणा पार पडणार असन सोहळा प्राथमिक शिवकालीन मर्दानी खेळ, घोडेस्वारीचे प्रात्यक्षिक सकाळी ९.३० वाजता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शासकीय अधिकारी, शिवशंभू भक्त व मान्यवरांच्या उपस्थितीत विशेष मेळावा आयोजित केला आहे.

सकाळी १० वाजता मुख्य शासकीय कार्यक्रमांतर्गत छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याचे अनावरण मान्यवरांची भाषणे होणार आहेत. सकाळी ११ वाजता ढोल- ताशा गजर, लेझीम पथक, शिवकालीन मर्दानी खेळ, घोडेस्वारी प्रात्यक्षिक, रक्तदान शिबिर, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी ११.३० वाजता छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर व्याख्यान व पोवाड्यांचा कार्यक्रम सादर होणार आहे. दिवसभर सर्व शिवभक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली आहे…

शिक्षक संघ, पंचायत समिती, तळागाळातील संघटना, संभाजी ब्रिगेड यांचा सहभाग राहणार आहे. कार्यक्रमादरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रक्तदान शिबिरही आयोजित केले असून शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करावे, असे आवाहन पुरंदर प्रतिष्ठान व संभाजी ब्रिगेडच्या वतीने केले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!