May 14, 2026 3:06 am

अहिल्यानगरचा सुशांत वडावकर IFS परीक्षेत देशात ३१ वा

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेसमध्ये (आयएफएस) येथील सुशांत वडावकर याने देशात ३१ वा क्रमांक मिळविला. सुशांत हा लोणी व्यंकनाथ (ता. श्रीगोंदे) येथील रहिवासी आहे. सोनोग्राफी तज्ज्ञ डॉ. उत्तमराव वडावकर व डॉ. सुनीता वडावकर यांचा तो मुलगा आहे.

सुशांतचे इंडियन सिव्हिल सर्व्हिस (आय. ए. एस.) हे पुढील स्वप्न आहे. त्याचे दहावीपर्यंतचे शिक्षण अहिल्यानगर येथील भाऊसाहेब फिरोदिया विद्यालय येथे झाले. दहावीला तो जिल्ह्यात प्रथम आला होता.

सुशांत याने चेन्नई येथील आय. आय. टी. मधून बी. टेक. नंतर एम. टेक. पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर त्याने केंद्रातील मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून सेवा केली. सोबतच त्याने भारतीय वन सेवेचा अभ्यास सुरू केला. मेहनत, चिकाटी, अफाट जिद्द व कठोर परिश्रमाद्वारे त्याने हे यश प्राप्त केले आहे.

या यशामध्ये त्याला आई-वडील यांच्यासह डॉ. महेश भागवत (आय.पी.एस.) व महेश जिवाडे (आय.आर.एस.) यांचे मार्गदर्शन लाभले. भारतीय वन सेवेत यश मिळवणारा सुशांत हा लोणी व्यंकनाथ येथील पहिला विद्यार्थी आहे. देशातील नैसर्गिक संपत्ती व वन्यजीवांचे रक्षण करण्यात श्रीगोंद्यातील या तरुणाचे अमूल्य योगदान असणार आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!