May 14, 2026 2:11 am

एका महिलेसाठी ९ जण धावून आले अन्.; नक्की काय घडलं?

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

येथे जागेच्या वादातूनएका महिलेला मारहाण केल्याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नसिमा राजू मुजावर (रा. चिक्कोडी), हसिना मंजूर मुल्लाणी, आकिब मुल्लाणी, मंजूर मुल्लाणी (सर्व रा. रांगोळी), शाहीन मणियार, शिफा मणियार, शाहीस्ता नदीम बारगीर, नदीम बारगीर (सर्व रा. कोल्हापूर) तसेच नेहाल राजू मुजावर(रा. चिक्कोडी) अशी संशयितांची नावे आहेत.

ही घटना रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास लंगोटे मळा परिसरात घडली. याबाबत सानिया साहील मुल्लाणी (वय २५, रा. काळम्मावाडी बसाहत, रांगोळी, ता. हातकणंगले) यांनी फिर्याद दिली आहे.याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी या आपल्या चुलत सासू आफरीनजावेद मुल्ला हिच्या घरी कपडे व मुलांना आणण्यासाठी गेल्या होत्या.

त्यावेळी जागेच्या वादातून स्टे-ऑर्डर लावल्याच्या कारणावरून संशयित आरोपींनी त्यांच्याशी बाद घातला. संशयित आरोपींनी बेकायदेशीर जमाव करून फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!