मध्य रेल्वेच्या दौंड-मनमाड विभागातील अकोलनेर – अहिल्यानगर – निंबलक स्थानकांदरम्यान दुहेरीकरणाच्या कामाच्या संबंधात प्री-नॉन इंटरलॉकिंग (प्री-एनआय) आणि नॉन-इंटरलॉकिंग (एनआय) कामासाठी विशेष ब्लॉक घेण्यात येत आहे.
या कामांमुळे रेल्वे गाड्यांवर मोठा परिणाम होणार असून विदर्भातून पुण्यात जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. काही रेल्वे गाड्यांच्या मार्गात तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.
या गाड्यांचे रद्दीकरण
गाडी क्रमांक १२११४ नागपूर ते पुणे गरीबरथ एक्सप्रेस प्रवास सुरु १५, १६ आणि १७ मे रोजी नागपूर येथून रद्द, गाडी क्रमांक १२११३ पुणे ते नागपूर गरीबरथ एक्सप्रेस प्रवास सुरु १६, १७ आणि १८ मे रोजी पुणे येथून रद्द , गाडी क्रमांक ०१४१५ पुणे ते गोरखपूर विशेष प्रवास सुरु १४ ते १८ मेपर्यंत पुणे येथून रद्द, गाडी क्रमांक ०१४१६ गोरखपूर ते हडपसर विशेष प्रवास सुरु १५ ते १९ मेपर्यंत गोरखपूर येथून रद्द, गाडी क्रमांक ०१४४९ पुणे ते दानापूर विशेष प्रवास सुरु १६ आणि १७ रोजी पुणे येथून रद्द, गाडी क्रमांक ०१४५० दानापूर ते हडपसर विशेष प्रवास सुरु १६ आणि १७ मे रोजी दानापूर येथून रद्द, गाडी क्रमांक १२१३६ / नागपूर ते पुणे एक्सप्रेस विशेष प्रवास सुरू १६ मे रोजी नागपूर येथून रद्द, गाडी क्रमांक १२१३५ पुणे ते नागपूर प्रवास सुरु १७ मे रोजी पुणे येथून रद्द आदी गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
गाड्यांच्या मार्गात परिवर्तन
गाडी क्रमांक ११०२५ पुणे – अमरावती एक्सप्रेस प्रवास सुरु १६, १७ आणि १८ मे रोजी पुणे येथून आपल्या नियोजित मार्गा ऐवजी दौंड, कुर्डुवाडी, लातूर रोड, परभणी, पूर्णा, अकोला मार्ग अमरावती येथे पोहचेल. गाडी क्रमांक ११०२६ अमरावती – पुणे एक्सप्रेस प्रवास सुरु १५, १६ आणि १७ मे रोजी अमरावती येथून आपल्या नियोजित मार्गा ऐवजी अकोला, पूर्णा, परभणी, लातूर रोड, कुर्डुवाडी, दौंड मार्ग पुणे येथे पोहचेल. गाडी क्रमांक २२१४० अजनी -पुणे एक्सप्रेस प्रवास सुरु १७ मे रोजी अजनी येथून आपल्या नियोजित मार्गा ऐवजी मनमाड, नाशिक रोड, कल्याण, पनवेल, कर्जत, लोणावळा मार्ग पुणे येथे पोहचेल. या शिवाय अनेक गाड्यांच्या मार्गात परिवर्तन करण्यात आले असून काही गाड्या उशिराने धावणार आहेत. या तांत्रिक कामामुळे रेल्वे प्रवाशांना मात्र प्रचंड मनस्तापाचा सामना करावा लागणार आहे.











