पुण्यातील अप्पर डेपोजवळ सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्पोटानंतर सगळीकडे एकच धावपळ पहायला मिळाली. याचे फोटो समोर आले आहेत.या स्फोटामुळे मंडप साहित्याला आग लागली, यानंतर आकाशात काळा धूर पहायला मिळाला.
या मंडप साहित्य जळून खाक झाले असून यामुळे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.या स्फोटाची माहिती मिळताच ग्निशमन दलाकडून चार वाहने आणि टँकर घटनास्थळी पोहोचली. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना घडली तो अत्यंत गजबजलेला परिसर आहे, आजूबाजूला अनेक दुकाने आहेत, या दुकानांनाही आग लागण्याची भीती होती, मात्र हे संकट टळलेले आहे.
सध्या या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र या आगीत लाखोंचे मंडप साहित्य जळून खाक झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
Post Views: 30











