May 14, 2026 7:12 am

निदा खानची सर्वात मोठी पोलखोल, तपासादरम्यान एसआयटी सुद्धा चक्रावली

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

नाशिकमधील TCS धर्मांतर प्रकरणी मुख्य संशयित निदा खान हिची विशेष तपास पथकाकडून (SIT) सखोल चौकशी सुरू आहे. या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर येत असून पीडित तरुणीवर मानसिक आणि धार्मिक प्रभाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचे तपासातून उघड होत आहे.

तपासानुसार, निदा खान हिने पीडितेचे मूळ नाव बदलून ‘हानिया’ ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. यासाठी पीडितेला धार्मिक विषयांशी संबंधित तब्बल १७१ लिंक्स पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या माध्यमातून पीडितेचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.

एसआयटीच्या तपासात निदा खान पीडितेच्या घरी जाऊन धार्मिक विधी करत असल्याचेही समोर आले आहे. पीडितेला विशिष्ट प्रार्थना करण्यास सांगणे, धार्मिक शिक्षण देणे आणि ठराविक प्रकारचे कपडे वापरण्यासाठी दबाव टाकल्याचे आरोप तपासात पुढे आले आहेत.

२६ मार्चपासून फरार असलेल्या निदा खानला ७ मे रोजी छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली होती. ती ज्या फ्लॅटमध्ये लपून राहत होती, तो फ्लॅट तिच्या नातेवाईकांचा नसून एमआयएमशी संबंधित नगरसेवक मतीन पटेल यांनी उपलब्ध करून दिल्याची माहिती समोर आली आहे.

निदा खान फरार असताना तिला आर्थिक मदत आणि अन्य सुविधा कोणी पुरवल्या, याचाही तपास सुरू आहे. तिच्यापर्यंत एमआयएमच्या नगरसेवकांचा संपर्क कसा झाला? याचा एसआयटी शोध घेत आहे. फरार असताना तिच्यासोबत आई-वडील आणि मावशीही राहत असल्याची माहिती समोर आली आहे.

निदा खानची पोलीस कोठडी सोमवारी संपत असल्याने तिला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. प्रकरणाचे गांभीर्य आणि तपासातील प्रगती लक्षात घेता, पोलिसांकडून कोठडी वाढविण्याची मागणी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, निदा खानचा मोबाईल फोन क्लोनिंगसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. मोबाईलमधून डिलिट करण्यात आलेले मेसेज, व्हिडीओ आणि संपर्क क्रमांक पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कॉल डिटेल्स, लोकेशन हिस्ट्री आणि फरारी काळातील हालचालींचाही एसआयटीकडून तपास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणातील अन्य संशयित दानिश शेख आणि तौसिफ अत्तार यांनाही एसआयटी ताब्यात घेण्याच्या तयारीत आहे. तिघांना समोरासमोर बसवून चौकशी केली जाणार असून, त्यातून आणखी महत्त्वाचे तपशील समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!