May 14, 2026 6:31 pm

आज ‘तोच’ जळगावचा मुलगा आहे स्टार गायक

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

मनोरंजनसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीतून मार्ग काढत आजच्या घडीला मोठं यश मिळवलं आहे. काही कलाकार आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी राहतं गाव, घर सोडून मुंबईला आले अन् आज ते सगळे यशाच्या शिखरावर आहेत.

अशाच एका प्रेक्षकांच्या लाडक्या गायकाबद्दल आपण जाणून घेऊयात. त्याने नुकतेच काही जुने फोटो शेअर करत भूतकाळातील आठवणींना उजाळा दिला आहे.

‘गुलाबी साडी’, ‘शेकी’ या गाण्यांमुळे घराघरांत पोहोचलेला प्रेक्षकांचा लाडका गायक म्हणजेच संजू राठोड. त्याच्या प्रत्येक गाण्याला नेटकऱ्यांचा तुफान प्रतिसाद मिळतो, मिलियन व्ह्यूज मिळतात. पण, तुम्हाला माहितीये का संजूचा हा प्रवास अजिबातच सोपा नव्हता. सुरुवातीच्या काळात त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.

संजूचा जन्म जळगावमधील धनवड गावात झाला. घरात संगीताची कसलीच पार्श्वभूमी नव्हती, स्टारडम वगैरे तर अजिबातच माहिती नव्हतं…संजूने संगीत क्षेत्रात करिअर करण्यासाठी विशेष असं शिक्षण देखील घेतलेलं नाहीये. संजू हा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होता. त्याला स्टेजवर परफॉर्म करताना सुद्धा प्रचंड भीती वाटायची. तो संयमी, लाजाळू होता आणि क्वचित कोणाशी तरी बोलायचा. पण, त्याच्या मनात संगीताविषयीचं प्रेम मात्र कायम होतं. भविष्याचं कोणतंही प्लॅनिंग केलेलं नव्हतं, तरीही कॉलेज सोडून त्याने मुंबईला जायचं आणि आपली स्वप्नपूर्ती करायची असं ठरवलं.

संजूने ट्रेनमध्ये दरवाजाच्या बाजूला बसलेला एक फोटो नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. तो लिहितो, “ट्रेनच्या प्रवासानेच मला यशाच्या स्टेशनपर्यंत पोहोचवलं…तो प्रवास आठवला की डोळे भरून येतात, पण चेहऱ्यावर एक समाधान असतं…जेव्हा पाय दुखायचे तेव्हा मन सांगायचं, “आज चालून घे, उद्या तुला धावायचं आहे.” त्या संघर्षानेच आज मला ही गती दिली आहे…पाऊस असो वा ऊन, ध्येयापर्यंत पोहोचण्याची ओढ इतकी होती की, कधी थकवा जाणवलाच नाही. माझा भूतकाळ आजही माझ्या आठवणीत जिवंत आहे, कारण त्याच प्रवासाने मला सांगितलं की शून्याची किंमत काय असते…माझ्या या प्रवासात सुरुवातीपासून साथ देणाऱ्या आणि माझ्या संगीतावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचा मी ऋणी आहे..” अशी पोस्ट शेअर करत संजूने सर्वांचे आभार मानले आहेत.

संजूच्या या पोस्टवर मराठी कलाकारांसह नेटकऱ्यांनी कमेंट्स करत त्याचं भरभरून कौतुक केलं आहे. दरम्यान, संजूने मराठी संगीत विश्वाला एक वेगळी दिशा दिली आणि आपल्या मातृभाषेतील गाणी जगभरात सुपरहिट करून दाखवली. त्याने पारंपरिक गाण्यांना आफ्रोबीट रिदम आणि पॉप संगीताची जोड दिली. त्याचं नुकतंच प्रदर्शित झालेलं ‘लाल बांगडी’ गाणंही सर्वत्र धुमाकूळ घालत आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!