May 14, 2026 5:09 am

पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्याला शिक्षा

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पोटच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका नराधम बापाला जुन्नर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावली आहे.या धक्कादायक घटनेमुळे जुन्नर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. मात्र, न्यायालयाने दिलेल्या या निकालामुळे पीडितेला न्याय मिळाला आहे.

ही घटना १९ डिसेंबर २०२० रोजी ओतूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली होती. पीडित ९ वर्षांची मुलगी शाळेच्या मधल्या सुट्टीत जेवण करण्यासाठी घरी आली होती. यावेळी घरात कोणीही नसल्याची संधी साधून नराधम पित्याने घराचा दरवाजा आतून बंद केला. त्याने मुलीला बेदम मारहाण करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार मुलीच्या आईला समजताच तिने तातडीने ओतूर पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली.

घटनेचे गांभीर्य ओळखून तत्कालीन पोलीस निरीक्षक पी. एच. कांबळे यांनी तपासाची चक्रे फिरवत नराधम बापाला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी या प्रकरणात भक्कम पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

या खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश एस. बी. शेलार (अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, जुन्नर) यांच्यासमोर झाली. सरकारी पक्षाने मांडलेले पुरावे आणि साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले.

पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत: जन्मठेपेची सक्त मजुरी आणि १० हजार रुपये दंड. दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास.

मारहाणीसाठी (भादवि ३२३): १ वर्षाचा सक्त कारावास आणि १ हजार रुपये दंड. दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त शिक्षा.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सरकारी वकील जी. के. खोडे यांनी सरकार पक्षातर्फे प्रभावीपणे बाजू मांडली. तपास पथकात पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वाजगीरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा समावेश होता.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!