May 14, 2026 10:34 am

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खुन करणाखा नराधमास आजीवन कारावसाची शिक्षा

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खुन करणाऱ्या नराधमास आजीवन कारावसाची शिक्षा भारती विद्यापीठ पोलीसांनी केलेल्या तपासाला यश.

दिनांक ०९/१०/२०१५ रोजी गंगा ओशन सोसायटी कात्रज, पुणे येथे पत्नीचे मुंडके व हातपाय धडा-वेगळे करुन मुंडके व कु-हाडीसह कात्रज चौकात फिरणाऱ्या आरोपी रामचंद्र सेहु चव्हाण मा. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे श्री सुमित जोशी यांनी दिनांक ०५/०५/२०२६ रोजी आजन्म कारावास शिक्षा सुनावली आहे. त्याबाबत अधिक माहीती खालीलप्रमाणे

पुणे शहरात गाजलेल्या खुन खटल्यापैकी एक असलेला या प्रकरणात गुन्हेगाराने त्याचे पत्नीवर चारित्र्याच्या संशयावरुन मुंडके व हात-पाय धडा वेगळे करुन क्रूर पध्दतीने खुन करुन, त्यानंतर आरोपी हा पत्नीचे शिर व रक्ताने माखलेली कु-हाड कात्रज चौकात फिरत असताना त्यास नागरीक व पोलीसांनी ताब्यात घेतले होते. तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक, शेखर शिंदे यांनी गुन्ह्याचा सखोल तपास पूर्ण करुन सबळ पुराव्यासह कोर्टात दोषारोपपत्र सादर केले होते. सदर गुन्ह्याची मा. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे यांचे न्यायालयात सुणावणी सुरु असताना सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांना न्याय मिळावा व आरोपीला कठोर शिक्षा व्हावी याकरीता श्री मिलिंद मोहिते, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, पुणे शहर यांनी वरिष्ठांचे आदेशाप्रमाणे सदरचा गुन्हा दत्तक घेवुन वेळोवेळी पाठपुरावा केला होता. नमुद गुन्ह्यात सरकारी वकील म्हणुन श्री अग्रवाल यांनी कामकाज पाहीले.

सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त साो, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा साो, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. राजेश बनसोडे साो, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. मिलींद मोहीते, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, पुणे शहर मा. राहुल आवारे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कैलास कोडग, पोउपनि रमेश चौधरी, पोहवा जितेंद्र सोणवणे, पोहवा विशाल मदने, मपोहवा रेखा मोटे यांनी केलेली आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!