May 14, 2026 11:50 am

प्राथमिक PM रिपोर्टमधून हादरवणारी माहिती समोर

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुण्यातील नसरापूर अत्याचार प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असताना आता या प्रकरणातून धक्कादायक माहिती उघड होत आहेत. 65 वर्षाच्या भीमराव कांबेळे या नराधमाने तोंड दाबून साडेतीन वर्षाच्या चिमुकलीचा अमानुष अत्याचार केला होता.

ज्या गोठ्यात तो गेली काही महिने राहत होता. तिथंच त्याने चिमुकलीला नरक यातना दिसल्या. अशातच आता ससून रुग्णालयाने चिमुकलीचा पोस्ट मॉर्टम रिपोर्ट सादर केला आहे. यामधून हादरवणारी माहिती समोर आलीये.

ससून रुग्णालयाचा प्राथमिक अहवाल सादर समोर आला आहे. यामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीने चिमुकलीच्या तोंडात बोळा कोंबून अत्याचार केल्याचं विच्छेदन अहवालात उघड झालं होतं. अशातच आता आणखी तपास केल्यानंतर अशी माहिती समोर आलीये, ज्यामुळे तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल.

तोंडाच पायमोजा कोंबल्याने चिमुकलीचा मृत्यू झाला होता. पण खरंच ती मेली का हे तपासण्यासाठी नराधमाने असं काही केलं की, कुणी सामान्य वृत्तीचा माणूस विचारही करणार नाही. नराधमाने तिचा मृत्यू झाल्याची खात्री करण्यासाठी आरोपीने तिच्या छातीत जोरात बुक्की मारल्याचंही वैद्यकीय अहवालात म्हटलं आहे.

चिमुकलीच्या तोंडात आरोपीने बोळा कोंबल्याचे आढळून आलं, तिचं नाक आणि तोंड दाबलं होतं. मुलीचे अंतर्गत अवयव (व्हीसेरा) हा प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेतील पुढील तपासणी करण्यासाठी पाठवले आहेत. त्याचा अहवाल आल्यावर ससूनकडून पोलिसांना अंतिम अहवाल दिला जाईल. चिमुकलीच्या चेहऱ्यावर ओरखड्यांच्या खुणा आहेत. तिच्या गुप्तांगालाही इजा झाल्याचे तपासणीद्वारे आढळून आले आहे, अशी माहिती देखील समोर आलीये.

चिमुकलीच्या बॉडीची मरणोत्तर तपासणी सरकारी रुग्णालय असलेल्या ससून रुग्णालयात झाली. त्यानंतर रुग्णालयाच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागातील वैद्यकीय तज्ज्ञांनी मृतदेहाची ‘इन कॅमेरा’ उत्तरीय तपासणी केली आणि त्याचा प्राथमिक अहवाल पोलिसांकडे सादर केला होता. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. अशातच आता आरोपी कांबळेचा पाय आणखी खोलात गेला आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!