May 14, 2026 2:59 pm

आईस्क्रीम विक्रेत्यावर 14 वर्षीय मुलीचा विनयभंगाचा आरोप

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील कोळवण परिसरात एक संतापजनक घटना घडली असून आईस्क्रीम विक्रीच्या बहाण्याने फिरणाऱ्या एका विक्रेत्याने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दुचाकीवरून आईस्क्रीम विक्री करत परिसरात फिरत होता. याच वेळी पीडित मुलगी आपल्या लहान चुलत बहिणीसोबत आईस्क्रीम घेण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपीने आईस्क्रीम देण्याच्या बहाण्याने मुलीला जवळ बोलावून तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.

घटनेनंतर घाबरलेली मुलगी तातडीने घरी परतली आणि तिने संपूर्ण प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर पालक आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ शोधमोहीम राबवत आरोपीला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीविरुद्ध गंभीर कलमांखाली कारवाई सुरू आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!