प्रतिनिधी, पुणे दि. ३ मे २०२६ : कात्रज येथील श्री विश्वकर्मा मंदिराचा कलशारोहन सोहळा रविवारी अत्यंत उत्साहात, भक्तिमय वातावरणात व दिमाखात पार पडला. या सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कलशारोहन निमित्त मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने नटला असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी मंदिराचे समस्त पदाधिकारी व सभासद यांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम करत अथक परिश्रम घेतले. तसेच देणगीदारांच्या मोलाच्या सहकार्यामुळे कार्यक्रम अधिक भव्य व यशस्वी ठरला.
या प्रसंगी आमदार भीमराव आण्णा तापकीर, नगरसेवक रोहिदास बाप्पू चोरघे, नगरसेवक अरुणभाऊ राजवाडे, माजी नगरसेवक राजाभाऊ कदम, युवा नेतृत्व स्वराज भैय्या बाबर, युवा उद्योजक अखिलभाऊ नायर, अजयभाऊ कपिले, माजी उपसरपंच गणेशशेठ काळे, उद्योजक पप्पूशेठ गुजर, युवा उद्योजक अनिल पिंटूभाऊ चोरघे तसेच सामाजिक कार्यकर्ते सचिन बदक आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
तसेच नातेवाईक, मान्यवर व मित्रपरिवार यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवली.
या पवित्र सोहळ्यास उपस्थित राहून सहकार्य, शुभेच्छा व आशीर्वाद दिल्याबद्दल मंदिर समितीच्या वतीने सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.











