पुणे: राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, सहकार नगर पोलीस स्टेशन येथे पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर कुलर भेट देण्यात आला. या उपक्रमाचे उद्घाटन स्वतः जानकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी अर्जुन पुरस्कार विजेते पै. काका (बप्पा) पवार, एसीपी पै. राहुल आवारे, एसीपी गोडसे साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार, पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या सामाजिक उपक्रमाचे आयोजन राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे शहराचे मा. शहराध्यक्ष आणि मराठवाडा मित्र मंडळाचे अध्यक्ष बालाजी दादा पवार यांनी केले होते. यावेळी पोलीस बांधवांनी आणि नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाला पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 217











