May 14, 2026 5:46 pm

3 बायका आणि 8 मुलांचा बाप, परिवाराला मोठा धक्का!

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

महाराष्ट्रात भयानक हत्याकांड घडले आहे. सोलापुरात एका तरुणाची सिनेस्टाईल निर्घृण हत्या करण्यात आली. हत्या करण्याआधी आरोपींनी सोशल मिडियावर स्टेटस ठेवला होता.यानंतर भर रसत्यात हत्या केली. मृत तरुणाला 3 पत्नी आणि 8 मुलं आहेत. कुंटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

सोलापुरातील 70 फूट रोड परिसरात ही काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास एका तरुणाची सहा जणांनी मिळून कोयता, काठी, तलवार, आणि दगडाच्या सहाय्याने निर्घृण हत्या केलीय. सुरेश कृष्णा श्रीराम (वय 35 वर्षे) असे हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. अंगावर काटा आणणारी संपूर्ण थरारक घटना पूर्णपणे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली.

आरोपींनी पूर्वनियोजित प्लॅन आखून हत्या केली आहे. संशयित आरोपींनी आपल्या इंस्टाग्राम या सोशल माध्यमावर ” रक्तचरित्र ” या चित्रपटातील डायलॉग तसेच व्हिडिओ ठेवला होता. एक साथ नही , एक एक करके मारेंगे अशा पद्धतीचा व्हिडिओ हा इंस्टाग्राम वर स्टेटस म्हणून ठेवल्याने आरोपींनी पोलिसांना देखील चॅलेंज दिले आहे की काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

या हत्या प्रकरणातीस आरोपी विजय श्रीराम, रोहित अण्णारेड्डी, करण श्रीराम, सुमित श्रीराम, राहुल अण्णारेड्डी या आरोपींना केवळ दोन तासात बेड्या ठोकल्या आहेत. घटनेतील मयत सुरेश श्रीराम याला तीन पत्नी असून त्यांची आठ लेकरं आता अनाथ झाली आहेत. मृत सुरेश कृष्णा श्रीराम हा याचा वडिलोपार्जित वराह पालनाचा व्यवसाय आहे.

काही वर्षांपूर्वी सुरेश श्रीराम याने 15-20 वराह मारून टाकल्याचा संबंधित आरोपींना संशय होता. अलीकडच्या काळात विविध कारणावरून उडणारे खटके यामुळे सहा तरुणांनी सुरेश श्रीराम याचा कायमचा काटा काढण्याचा प्लान बनवला. यातूनच त्याची हत्या केली.

जुन्या वादाचा कडेलोट झाला आणि अगदी सकाळच्या सत्रातच लाठी – काठी कोयता, आणि दगडाने सुरेश श्रीराम याला ठेचून काढण्यात आलं. मयत सुरेश श्रीराम याच्या आजोबांपासून संशयित आरोपी अण्णारेड्डी यांच्या विरुद्ध त्यांचे वाद सुरू आहेत. सोलापुरात भर दिवसा हत्या झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गुन्हेगारांमध्ये पोलिसांची दहशत कमी झाली असून या घटनेचा जाहीर निषेध करत करतो. अशा भावना जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग रजपूत यांनी व्यक्त केल्या आहेत.

मयत सुरेश श्रीराम याला एकूण तीन भाऊ असून एक दिव्यांग आहे. त्याच्या इतर दोन्ही भावांचाही पूर्वी अशाच वादातून खून झाल्याची चर्चा सिव्हिल हॉस्पिटल परिसरात सुरू होती. मयत सुरेशला तीन पत्नी, सहा मुली, दोन मुले असल्याची माहिती देखील समोर आली. मात्र घटनेतील मयत व्यक्ती सुरेश आणि हत्या करणारे सर्व आरोपींवर यापूर्वीचे देखील गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!