May 14, 2026 6:30 pm

लिव्ह-इन ते लग्न..! धर्मांतर, बुरखा अन् मांस खाण्याची सक्ती

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

हिंदू मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून, त्यानंतर तिच्याशी लिव्ह-इन रिलेक्शनमध्ये राहून, पुढे लग्न करून, तिला धर्मांतर, बुरखा आणि गोमांस खाण्याची सक्ती करण्याचा धक्कादायक प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी इथं समोर आला आहे.

या प्रकाराने खळबळ उडाली असून, हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या प्रकरणात शिर्डी पोलिसांनी हमीद पठाण याला अटक केली.

या प्रकरणात पीडिताने पोलिसांकडे जबाब दिला आहे. यात तिने संगमनेर इथं मार्केटिंगचे काम करत असताना, तिथं मुस्लिम युवक हमीद पठाण याच्याशी ओळख झाल्याचे सांगितले. काम करत असतानाच रिलेक्शनमध्ये आलो. पुढे लिव्ह-इनमध्ये राहायला लागलो. हा सर्व प्रकार घरच्यांना कळल्यानंतर वाद सुरू झाले. त्यानंतर मी घरातून निघून आले अन् त्याच्याबरोबर राहायला लागल्याचे पीडिताने सांगितले.

पुढे छत्रपती संभाजीनगर इथं राहायला गेलो. तिथे दोन-तीन महिने राहिलो. तेव्हा आम्ही नोटरी करून, एकत्र राहिला लागलो. त्यानंतर आम्ही पुन्हा शिर्डी इथं आलो. तिथं आल्यानंतर त्याने डोक्याला टिकली लावयाची नाही, बाहेर जायचे नाही, बुरखा घालायचा, असे म्हणू लागला. यावरून वाद होऊन हमीद मारहाण करायचा, असेही पीडिताने म्हटलं आहे.

घरच्याना धमक्यांचे फोन करायचा. यानंतर मांस खाण्याची सक्ती करू लागला. पण आपण काही खाल्लं नाही. यानंतर तो संशय घेऊ लागला. जुगारीचा छंद होता. यातून कमवलेला पैसा जात होता. अशा वादात दोन ते तीन वर्षे गेले. या काळात बाळ झाले. आता महिन्याभरापूर्वी वाद घालत मारहाण केली. पोलिसांना बोलावून घेतले, तेव्हा त्यांच्यासमोरच जिवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा, पीडितेने केला आहे.

यानंतर घरी गेल्यावर पुन्हा फोन करून धमकी देऊ लागला. घरच्याना फोन करून मारण्याची धमकी दिली. आता पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. मारहाण करताना, धर्म स्वीकारण्यासाठी माझ्यावर हमीद दबाव टाकत होता, असे सांगताना कोणी कितीही आपल्यावर प्रेम करो, पण अशांच्या जाळ्यात अडकू नका, असे आवाहन आता पीडितेने केले आहे.

भाजप कार्यकर्ता योगेश सूर्यवंशी म्हणाले, “या पीडितेने मला समाज माध्यमावरून संपर्क केला. तिला फोन नंबर शेअर केल्यावर सर्व घटनाक्रम समोर आला. ही पीडिता गुजरात होती. तिला इकडं बोलावल्यानंतर तिने धर्मांतरासाठी दबाव आणला जात असल्याचे सांगितले. त्यावेळी तिला आम्ही पोलिसांची मदत मिळवून दिली. पोलिसांनी जिहादवृत्तीच्या युवकावर गुन्हा दाखल केला आहे.”

नाशिकमधील प्रकरण आणि हे प्रकरण म्हणजे, ही जिहादी प्रवृत्ती सर्वत्र घुसली आहे. या प्रवृतीपासून हिंदू महिला, मुलींनी सावधच राहिले पाहिजे. या प्रकरणातील पीडिता आणि तिच्या लहान मुलीचे शुद्धीकरण करून, हिंदू धर्मात परत घेणार आहोत, असे योगेश सू्र्यवंशी यांनी सांगितले.

हमीद पठाण याची पार्श्वभूमी सांगताना, तो गुन्हेगारी प्रवृत्ती आहे. तो नंदूरबार इथं अटकेत होता. तो दरोडे टाकायचा. याच गुन्ह्यात त्याला अटक झाली होती, असा दावा योगेश सूर्यवंशी यांनी केला आहे. शिर्डी पोलिसांनी गुन्हा नोंदवत, हमीद पठाण याला अटक केली.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!