May 14, 2026 11:12 pm

किल्ले सिंहगड पार्किंग पर्यटकांवर मधमाशाचा हल्ला सुरक्षा कर्मचारी सतर्कता अनर्थ टळला

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

किल्ले सिंहगड दि.(१ )महाराष्ट्र दिन आज सिंहगडावर उष्ण तापमान असलेल्या मुळे गडावर पर्यटकांची संख्या रोडावली आहे.आज महाराष्ट्र दिन शासकीय कामगार सुट्टी असल्याने थोडीफार गर्दी जाणवत ह़ोती.

दुपारी ठिक बारा ते एक वाजण्याच्या सुमारास सिंहगड पार्किंग येथे शेजारी असलेल्या गडाच्या तटबंदीला मधमाशांचे पोळ होते.मधमाशांनी तेथील पर्यटक यांच्यावर हल्ला केला.

तीन, चार पर्यटकांना चावा घेतला.पुढील अनर्थ होऊ नये म्हणून सिंहगड पार्किंग सुरक्षा कर्मचारी यांनी पर्यटकांना सुखरूप सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले व हलवले.जास्त पर्यटकांची गर्दी होऊ नये.संभव धोका निर्माण होऊ नये.म्हणून गडा खालील दोन चेकपोस्ट नाका काही काळ बंद ठेवण्यात आले होते.येथील सुरक्षा कर्मचारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

पर्यटकांनी गडावर फिरताना स्वताची काळजी घ्यावी व मधमाशांच्या पोळ यापासून दूर अंतर ठेवावे मधमाशा पोळ असेल त्या भागात जाणे टाळावे.असे वनविभाग, संयुक्त वनव्यवस्थापन समिती घेरा सिंहगड यांच्या कडुन आव्हान करण्यात आले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!