May 15, 2026 12:40 am

एकाच कुटुंबातील तिन्ही भावंडे पोलिस दलात

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

जुन्नर तालुक्याच्या अतिदुर्गम पश्चिम आदिवासी भागातील देवळे येथील वैशाली वाल्हू शेळके हिची पोलिस दलात निवड झाली. नुकत्याच जाहीर झालेल्या पोलिस भरतीच्या निकालात पिंपरी-चिंचवड शहर पोलिस दलात वैशालीची निवड झाली आहे.

शेळके कुटुंबातील दोन मुली व एक मुलगा असे तीनही जण महाराष्ट्र पोलिस दलात भरती झाल्याबद्दल कुटुंबाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

देवळे या अतिदुर्गम आदिवासी भागातील वैशाली ही शेतकरी कुटुंबातील असून वडील वाल्हू दुंदा शेळके व आई विमल हे शेती व्यवसायावर कुटुंबाची उपजीविका चालवितात. वाल्हू शेळके यांनी मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य देत तीनही मुलांना उच्च शिक्षण दिले. वैशालीचे प्राथमिक शिक्षण देवळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तर माध्यमिक शिक्षण हे अजितदादा पवार विद्यालयात झाले. तर, मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयातून तिने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.

वैशालीचा मोठा भाऊ सागर याची २०२२ साली सांगली पोलिस दलात तर मोठी बहिण शीतल शेळके-घोटकर हिची २०२४ साली पुणे ग्रामीण पोलिस दलात निवड झाली होती. मोठा भाऊ व बहीण हे दोघेही पोलिस दलात असल्याने त्यांच्याकडून प्रेरणा घेत वैशालीने पोलिस भरतीची तयारी केली. कुटुंबाचे मार्गदर्शन, प्रयत्नातील सातत्य व चिकाटीच्या जोरावर हे यश मिळाल्याचे वैशाली सांगते.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!