May 15, 2026 2:53 am

एमआयटी विश्वशांती गुरुकुलच्या मदर्स डे सोहळ्यात ‘सुपर मॉम’ सन्मान

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

येथील एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूलमध्ये “आई आणि मी” या संकल्पनेवर आधारित “मदर्स डे” अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. आई आणि मुलांमधील नात्यातील जिव्हाळा अधिक दृढ करण्यासाठी तसेच पालकांचा शालेय उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित माता आणि शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा अँथनी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर सर्व मातांचे “सुपर मॉम” बॅज देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या आईंसाठी विविध कला व नृत्याविष्कार सादर केले.

आई आणि मुलांनी एकसारख्या रंगातील पोशाख परिधान करून केलेल्या रॅम्प वॉकमुळे कार्यक्रमात विशेष रंगत आली. “क्राऊन मेकिंग” या आर्ट अँड क्राफ्ट उपक्रमात मातांनी आपल्या लहानग्यांसोबत सर्जनशीलतेचे सुंदर दर्शन घडवले.

यानंतर मातांनी पूल पार्टीमध्ये उत्साहाने सहभाग घेत संगीत आणि नृत्याचा मनमुराद आनंद लुटला. कार्यक्रमाच्या समारोपावेळी शाळेच्या वतीने सर्व मातांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थी व पालकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे “मदर्स डे” अविस्मरणीय ठरला.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!