May 15, 2026 3:53 am

मुलाच्या सासरच्या महिलांनी बापाचे कपडे काढले, चौकात विवस्त्र करून अमानुषपणे केली मारहाण

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापुरात माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. एका ७० वर्षीय वृद्ध पित्याला विवस्त्र करून लोखंडी रॉडने मुलाच्या सासरच्या लोकांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.

ही लोक एवढ्यावरच थांबली नाहीतर गावाच्या चौकामध्ये आणूनही मारहाण केली आणि नंतर घरातील साहित्याला आग लावून दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील भालगाव शिवारात माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना घडली आहे. ७० वर्षीय भीमराज साळुंके या वृद्धाला मुलाच्या सासरच्या लोकांनी मारहाण केली आहे. या प्रकरणी ९ जणांविरोधात दुन्हा दाखल केला आहे.

28 एप्रिल रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मुलाच्या सासरच्या लोक आणि साळुंके कुटुंबामध्ये कुठल्या तरी कारणावरून वाद झाला होता. कौटुंबिक वादाचे रूपांतर भीषण हिंसेत झालं. या वादातून मुलाच्या सासरच्या लोकांनी भीमराव साळुंके यांना मारहाण केली. बोलरो गाडीमध्ये त्यांना बसवून गावातील चौकात आणण्यात आलं. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय की, गाडीतून ३ बायका आणि ४ पुरुष उतरले, त्यांनी भीमराव साळुंके यांना बळजबरीने घेऊन आले होते. गाडीतून खाली उतरवल्यानंतर लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने मारहाण सुरू केली.

धक्कादायक म्हणजे, या महिलांनी साळुंके यांचे कपडे खाली उतरवले आणि बेल्ट आणि रॉडने मारत मारत गावातील चौकात आणलं. विवस्त्र करून लोखंडी रॉडने बेदम मारहाण करत गावातील चौकात घेऊन आले तिथे त्यांना विवस्त्र अवस्थेत गावकऱ्यांसमोर महिलांनी आणि पुरुषांनी बेदम मारहाण केली. केवळ मारहाणीवरच न थांबता, या नराधमांनी पीडिताचे घर आणि शेतात साठवून ठेवलेला २५० क्विंटल कांदाही आगीच्या हवाली केला. या अमानवीय कृत्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

या आरोपींनी भीमराज साळुंके यांना विवस्त्र करून लोखंडी रॉडने अमानुष मारहाण केली. ज्यात ते गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत ते जागेवर कोसळले. त्यानंतर त्यांना फरफटत नेत गावाच्या वेशीवर सोडून पळून गेले. या भीषण घटनेनंतर अमोल भीमराज साळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिल्लेगाव पोलीस ठाण्यात ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साळुंके यांना मारहाण का आणि कोणत्या कारणासाठी झाली, याची माहिती अद्याप समोर आली आहे. पण, या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!