May 15, 2026 6:56 am

केईएम रुग्णालयाच्या नामांतराला मंजुरी, ‘हे’ असणार नवे नाव

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

शहरातील प्रसिद्ध असे केईएम अर्थात किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालयाचे नाव बदलण्यात यावे, अशी मागणी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली होती. त्यांनी त्या आशयाचे पत्र सुद्धा महापौर रितू तावडे यांना दिले होते.

त्यानंतर हा प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीकडे पाठवण्यात आला होता. आरोग्य समितीकडे हा प्रस्ताव आल्यानंतर तो मंजूर करुन आयुक्तांकडे अभिप्राया करता पाठवला गेला होता, आता आयुक्तांनी सुद्धा या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे ऐतिहासिक केईएम रुग्णालयाचे जुने नाव बदलून त्याला आता “कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय” या नावाने ओळखले जाणार आहे. परंतु, या नामांतरणाला रेसिडेंट डॉक्टर्ससोबतच विरोधकांकडूनही तीव्र विरोध करण्यात आला आहे.

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्याच्या या निर्णयाला सुरुवातीपासूनच राजकीय स्तरावर विरोध होत होता. सर्वाधिक विरोध हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून करण्यात आला होता. मात्र, प्रशासकीय पातळीवर सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या असून आयुक्तांनी स्पष्ट केले आहे की, आरोग्य समितीचा निर्णय अंतिम राहील. शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या विरोधाला न जुमानता हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यामुळे आता केईएम रुग्णालयाचे नाव बदलून ‘कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय’ असे होणार आहे. रुग्णालयाचे नाव बदलण्याबाबत राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मागणीला यश मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

रुग्णालयाचे नाव बदलण्याचे पत्र मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आरोग्य समिती अध्यक्ष हरीश भांदिर्गे यांना दिले होते. हे पत्र त्यांनी गेल्या आठवड्यात आरोग्य समितीच्या पटलावर ठेवले आणि गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत या पत्राला मंजुरी देण्यात आली. नामांतराचा ठराव मंजूर करून अभिप्रायासाठी मुंबई महापालिका प्रशासनाकडे सादर केला आहे. नामांतराचा ठराव मंजूर झाल्यानंतर आता त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. डॉक्टरांची संघटना असलेल्या मार्डने सुद्धा या नामांतराला तीव्र विरोध दर्शवला आहे. मंगलप्रभात लोढा यांनी यापूर्वीही रुग्णालयाचे नाव बदलण्याबाबत प्रशासनाला पत्र पाठविले होते. मात्र, त्यावर ठोस निर्णय झाला नव्हता. रुग्णालयात उत्तमोत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याऐवजी नामांतराचा अट्टाहास का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!