बुलढाण्यात एक दुर्दैवी घटनाघडली आहे. बुलढाणा तालुक्यातील गिरडा येथील चेतन सोळंकी या 18 वर्षीय विद्यार्थ्याचा बस स्थानकात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे गिरडा गावात शोककळा पसरली आहे.
चेतन हा पोलिस भरतीची तयारी करत होता, छत्रपती संभाजीनगर येथे त्याने तसा प्रयत्न ही केला असून मैदानी चाचणीत तो खरा उतरला असून लेखी परीक्षा बाकी होती. काल संध्याकाळी सायंकाळी चेतन हा बुलढाणा वरुण धाड ते मढ या एस टी बसमध्ये जाण्यासाठी चढत होता, मात्र गर्दी असल्याने तोल जाऊन तो बसच्या चाकाखाली आली.
त्याला गंभीर अवस्थेत त्याला खाजगी रुग्णालयात भरती केले असता प्राथमिक उपचार करून त्याला छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला .
या घटनेमुळे चेतनच्या कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे . अतिशय गरीब घरातील चेतन विद्यार्थी असल्याने होतकरू होता अशी माहिती ग्रामस्थानी दिली. शासनाने त्याच्या कुटुंबांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी सुद्धा ग्रामस्थानी केली आहे.











