May 15, 2026 7:04 pm

नाशिकच्या नामांकित रुग्णालयात भयंकर घडलं, काळीज चिरणारा आक्रोश

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

नाशिक शहरातील आडगाव परिसरातील एका नामांकित मेडिकल कॉलेजमध्ये एका धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या कॉलेजमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहेत. ज्यात एक तरुण ‘माझ्या आईला मारून टाकलं रे’ असं म्हणत ओक्साबोक्सी रडताना दिसत आहे.

त्याचा हा आक्रोश ऐकून संपूर्ण रुग्णालय परिसर सुन्न झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून रुग्णालयातील सुरक्षेबाबत प्रश्न विचारला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना नाशिक शहराच्या आडगाव परिसरातील एमव्हीपी मेडिकल कॉलेजमध्ये घडली. मेडिकल कॉलेजमधील लिफ्ट अचानक कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात ज्योती अहिरे नामक महिला कर्मचारी गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे कॉलेज आणि रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ज्योती अहिरे या मेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत आहेत. आज कामावर असताना त्या लिफ्टमध्ये काही वस्तू ठेवत होत्या. त्याच वेळी तांत्रिक बिघाड झाल्याने लिफ्ट अचानक कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये ज्योती अहिरे यांना गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मेडिकल कॉलेज सारख्या गजबजलेल्या ठिकाणी लिफ्ट कोसळल्याची घटना घडल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेत एमव्हीपी मेडिकल कॉलेज प्रशासनाने तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. ही लिफ्ट नेमकी कशामुळे कोसळली? लिफ्टचे मेंटेनन्स वेळेवर होते का? आणि याला जबाबदार कोण? अशा सर्व अंगांनी तपास केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलिसांनी रुग्णालय परिसरात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून अपघाताच्या कारणांचा शोध सुरू केला आहे. लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वजन होते की तांत्रिक बिघाड झाला, याबाबत तंत्रज्ञांकडूनही माहिती घेतली जात आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!