April 27, 2026 5:17 pm

वरातीतील वादाचा शेवट खुनात; १० तासांत ४ आरोपी जेरबंद

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

दिनांक २५/०४/२०२६ रोजी ०१.३० वा चे सुमारास शिवसृष्टी गदा चौकापासुन कात्रजकडे जाणान्या सव्हीस रोडवर इसम नामे तेजस दत्तात्रय पिलाणे, वय २४ वर्षे, रा. मोहननगर, धनकवडी, पुणे हा जखमी, बेशुध्द अवस्थेत मिळुन आला होता. त्यामुळे त्यास उपचारकामी भारती हॉस्पीटल येथे आणले असता त्यास डॉक्टरांनी मयत घोषित केले.

नमुद घटना ही रात्रीच्या वेळी असल्याने, तसेच घटनास्थळ हे शिवसृष्टी गदा चौकापासुन कात्रजकडे जाणाऱ्या सव्र्व्हस रोडवरील असल्याने सदर ठिकाणी कोणतेही सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. त्यामुळे मयत इसमास कोणी जिवे ठार मारले याबाबत काही माहीती मिळून येत नव्हती.

त्यामुळे मा. वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार सचिन सरपाले, मंगेश पवार हे मयताबाबत तपास करीत असताना त्यांना मयत इसमाची कोंढावळे, ता वेल्हा, जि पुणे येथे इसम नामे विशाल दत्तात्रय खोपडे याचे सोबत भांडणे झाली असल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर मयताचे नातेवाईक व साक्षीदारांकडे केले तपासामध्ये मयत इसमाची दिनांक १४/०३/२०२६ रोजी कोंढावळे, ता. वेल्हा जि. पुणे येथे मयताचे मावस भाऊ केतन खोपडे याचे लग्नाचे वरातीमध्ये नाचण्यावरुन वादीवाद झाले होते. त्यानंतर मयत इसमाची आरोपी विशाल खोपडे याचे सोबत भांडणे झाल्याचे रागातुन विशाल दत्तात्रय खोपडे याने त्याचे साथीदारांच्या मदतीने मयत इसमास जीवे ठार मारले असल्याचे निष्पन्न झाल्याने मयताचा भाऊ प्रदिप मारुती पिलाणे यांनी दिले तक्रारीवरून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर १६३/२०२६ भारतीय न्याय सहिता १०३ (१),३ (५) नुसार गुन्हा दाखल आहे.

दाखल गुन्ह्यातील आरोपी विशाल दत्तात्रय खोपडे व त्याचे साथीदारांचा मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार महेश बारवकर, किरण साबळे यांनी नमुद आरोपीचे मोबाईल फोन, त्यांचे इस्टाग्राफ अकाऊंन्टचे तांत्रिक विश्लेषण केले असता सदरचे आरोपी हे शिरवळ, तालुका खंडाळा जिल्हा सातारा या ठिकाणी असल्याचे माहिती मिळाली. त्याप्रमाणे नमुद अधिकारी व अंमलदार यांनी शिरवळ या भागात जाऊन आरोपींचा शोध घेवुन ताब्यात घेतले. गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी नामे १. विशाल दत्तात्रय खोपडे, वय २२ वर्षे, रा. सध्या आई निवास, रंगा शेठ बंगल्याजवळ, सच्चाईमाता. आंबेगाव खु, पुणे, मुळ गाव कोंढावळे, ता वेल्हा, जि पुणे २. अभिषेक दिलीप खोपडे, वय २३ वर्षे, रा. के. ऑफ राहुल कदम यांचे चाळीमध्ये रूम नंबर ३. आयप्पा मंदीराजवळ, सच्चाईमाता, जैन मंदीराजवळ, आंबेगाव खु, पुणे, मुळ गाव कोंढावळे, ता. वेल्हा. जि पुणे २. सचिन हरीचंद्र धुळे, वय ४३ वर्षे, रा. भारतनगर, शंकर मंदीराजवळ, कात्रज, पुणे ४. अदिनाथ शिवाजी कसबे, वय १९ वर्षे, रा. सुंदरनगर, मांगडेवाडी, पुणे असे ४ जणांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना नमुद गुन्हयामध्ये दिनांक २५/०४/२०२६ रोजी सायंकाळी अटक केली आहे. पुढील तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार गा. पोलीस आयुक्त साो, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा साो. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. राजेश बनसोडे साो, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. मिलींद मोहीते सो गा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २. मा. राहुल आवारे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कैलास कोडग, सपोनि स्नेहल थोरात, सपोनि स्वप्निल पाटील, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंगलदार महेश वारवकर, मंगेश पवार, अवधुत जमदाडे. सचिन सरपाले, किरण साबळे, राजेंद्र विरामणे, विजय पोळ, गणेश भोसले, दिगंबर भोगण, मितेश चोरमोले, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, अभिनय चोधरी, सागर वोरगे, तुकाराम सुतार, संदीप आगळे, यांच्या पथकाने केली आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!