पुणे : अल्पसंख्यांक ख्रिश्चन समाजाने शिक्षण व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. आता उद्योजकतेच्या क्षेत्रात पुढे येऊन समाजासाठी मोठे योगदान द्यावे, असे आवाहन बिशप सायमन अल्मेडा यांनी केले.
पुणे शहरातील अल्पसंख्यांक ख्रिश्चन उद्योजक व व्यावसायिकांच्या ‘मायनॉरिटी अँड इंडियन ख्रिश्चन मेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’ या संस्थेच्या स्थापनेचा समारंभ शुक्रवारी ढोले पाटील रस्त्यावरील मारिया असुंटा कॉन्व्हेंटच्या सभागृहात उत्साहात पार पडला. यावेळी बिशप सायमन अल्मेडा,पास्टर पिटर जॉर्ज तसेच इंडो-इस्रायल चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष गुल क्रिपलानी ऑनलाईन पद्धतीने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
एनआयसीएचईचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. विशाल मोरेश्वर,पिटर डिसुझा, जयकर राव,राहुल डंबाळे, खिसाल जाफरी आदी विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. याशिवाय अल्पसंख्यांक समुदायातील उद्योजक, तज्ज्ञ आणि विविध क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थेचे आध्यात्मिक संचालक फादर एन्थनी डिसूझा, पीटर जॉर्ज, मारिया गोरेट्टी तसेच उद्योगपती पीटर डिसूझा यांचीही उपस्थिती होती. संस्थापक अध्यक्ष लुकस केदारी यांनी सर्व मान्यवरांचा सत्कार केला.
संस्थेचे सदस्य शिरीष सेबास्टियन, ज्युलियस झेवियर, नितीन काळे, फादर अँटोन डिसूझा, पास्टर पीटर जॉर्ज,संजय गायकवाड,कुमार महापुरे, जॉन रूपवते, उपस्थित होते.
प्रास्ताविकात लुकस केदारी म्हणाले की, समाज राजकीयदृष्ट्या सबळ नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत उद्योजक व व्यावसायिकांचे संघटन करून त्यांना मार्गदर्शन करणे आणि नव्या उद्योजकांना प्रोत्साहन देणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. राज्यातील प्रत्येक मोठ्या शहरात तसेच तालुका व जिल्हा पातळीवर संस्थेच्या शाखा सुरू करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.ख्रिश्चन समाजाचे अधिकृत व्यवसाय चेंबर म्हणून मिकी ही संस्था कार्य करेल.
विशाल मोरेश्वर, पीटर डिसूजा, डॉ. विशाल मोरेश्वर, जयकर राव, अँथोनी डिसूजा, मारिया गोरट्टी, राहुल डंबाळे, नितीन काळे, मनोज मगर, खिसाल जाफरी आदींनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले.
संस्थेचे संस्थापक लुकस केदारी संस्थेच्या मार्फत समाजात प्रकाश देण्याचे काम करत आहे. कोणत्याही कामाची सुरुवात लहानापासून होते. आज आपण रोवले असून चा विस्तार भविष्यात खूप मोठा होईल, त्यासाठी सर्वांनी आपण एकत्रित येऊन काम केले पाहिजे, असल्याचे मान्यवरांनी आपल्या मनोगतातून सांगितले. व्यवसाय समुदायासाठी संधी निर्माण करण्याचे काम सुरू असले तरी त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
देशाच्या सर्वांगीण विकासात ख्रिस्ती समाजाचे योगदान महत्त्वाचे असून, उद्योजकतेच्या माध्यमातून आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे पुढाकार घ्यावा, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिरीष सेबास्टियन यांनी केले, तर अंटन कदम,जॉर्ज रॉग्डिज,सि. मेर्सी,सुधीर खरात, जेम्स साळवे, रॉकी डिसुझा, जयशिलन, प्रमोद पारधे, मार्कस पंडीत यांनी कार्यक्रमाच्या नियोजनात हातभार लावला.











