April 24, 2026 12:28 am

“रिफ्लेक्शन्स” कला प्रदर्शनाचे उत्साहात उद्घाटन; कलादालनात रसिकांची गर्दी

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

बालगंधर्व कलादालन येथे “रिफ्लेक्शन्स” या विशेष कला प्रदर्शनाचे उद्घाटन आज गुरुवारी सकाळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. सेठ दगडूराम कटारिया हायस्कूलचे ५० हून अधिक माजी विद्यार्थी विविध क्षेत्रांत कार्यरत असतानाही कलेच्या माध्यमातून एकत्र आलेले पाहून समाधान वाटते, असे मत व्यक्त करत *पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम* यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. *“विविध व्यावसायिक क्षेत्रांत काम करणारे विद्यार्थी आजही कलेमुळे आणि आपल्या प्रिय शिक्षिकेमुळे एकत्र राहिले आहेत, ही संकल्पना अत्यंत अनोखी आहे. अशा प्रदर्शनांमुळे दैनंदिन तणावातून दिलासा मिळतो. आमच्यासारख्या शासकीय अधिकाऱ्यांनाही अशा उपक्रमांतून लोकांना आणि त्यांच्या कामाला जवळून जाणून घेण्याची संधी मिळते,”* असे ते म्हणाले.

या प्रसंगी प्रा. डॉ. नचिकेत ठाकूर आणि अभिनेत्री रुजुता देशमुख यांचीही प्रमुख उपस्थिती होती. “कटारीयन्स आर्ट ग्रुप”च्या माध्यमातून आयोजित या प्रदर्शनात चित्रकला, स्केचिंग, वॉटरकलर आदी विविध माध्यमांतील कलाकृतींचे सादरीकरण करण्यात आले आहे.

या उपक्रमामागे कला शिक्षिका शैलजा पाठक मॅडम यांचे मार्गदर्शन असून, त्यांच्या प्रेरणेनेच विद्यार्थ्यांनी कलेशी असलेले नाते जपले आहे. प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी पुणेकर रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.

*हे “रिफ्लेक्शन्स” प्रदर्शन दि. २३, २४ आणि २५ एप्रिल २०२६ दरम्यान सर्वांसाठी खुले राहणार आहे. प्रदर्शनाचे ठिकाण बालगंधर्व कलादालन, पुणे असून, दररोज सकाळी १० ते सायंकाळी ७.३० या वेळेत रसिकांना भेट देता येईल.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!