April 23, 2026 4:44 pm

पुण्यातील अप्पा बळवंत चौकातील अपघाताचा CCTV व्हिडीओ समोर

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुण्यातील सर्वात गजबजलेलं आणि शहरातं मध्यवर्ती ठिकाण म्हणजे अप्पा बळवंत चौक… शनिवारवाड्याच्या मागेच्या बाजूला असलेल्या या अप्पा बळवंत चौकात काल एक धक्कादायक प्रकार घडला.

पुणेकरांची लाईफलाईन म्हणजेच प्रवाशांनी भरलेली एक पीएमपीएमएल बस काल थेट अप्पा बळवंत चौकातील एका दुकानात शिरल्याचा प्रकार समोर आला होता. भरधाव असलेल्या पीएमपी बसचे ब्रेक फेल झाल्याने अचानक नियंत्रण सुटलं आणि ती थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानात शिरल्याचं पहायला मिळालं होतं. अशातत याचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.

पीएमपीच्या या धडकेत दुकानाचे नुकसान झालं असून, सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या थरारक घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे. झालं असं की, नेहमीप्रमाणे भर उन्हात देखील लोकांची गर्दी होती. त्यावेळी वडगाव ते पुणे स्टेशन अशी चाललेली पीएमपी बस ही जात असताना अचानक या बसचा ब्रेक फेल झाला. बस चालकाचं स्टेअरिंगवरचं नियंत्रण सुटलं अन् बस थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानात शिरली. त्यानंतर एकच धावपळ सुरू झाली.

समोर आलेल्या सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये दिसतंय की, 3 वाजून 44 मिनिटांनी बस नियंत्रणाच्या बाहेर गेली अन् रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका दुकानाला जाऊन धडकली. अपघातावेळी दुकानात काही ग्राहक आणि कर्मचारी उपस्थित होते, मात्र सुदैवाने सर्वजण सुखरूप बचावले. पण दुकानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचं दुकानदाराने म्हटलं आहे.

दरम्यान, पुण्यातील बससेवा काही वर्षांपूर्वी उच्च दर्जाची मानली जात होती. पण आता अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. पीएमपी प्रशासनाकडून या बसची तांत्रिक तपासणी करण्यात येणार असून, चालकाच्या दाव्यात किती तथ्य आहे, हे तपासानंतर स्पष्ट होईल, अशी माहिती पीएमपीएमएलकडून देण्यात आली आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!